E-Paper

कराड शहरातील सुजान नागरिकांना गुंड म्हणणं नगराध्यक्षांना शोभते का ? 

विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांचा सवाल ?

कराड शहरातील सुजान नागरिकांना गुंड म्हणणं नगराध्यक्षांना शोभते का ?

विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांचा सवाल ?

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी 28 जुलै रोजी कराड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरल्याने तसेच विरोधकांनी एका विशिष्ट प्रभागातील नागरिकांना या सभेत गोंधळ निर्माण करण्याच्या व सभा उधळून लावण्याच्या उद्देशाने प्रेक्षक गॅलरीत बसाविण्याचे नियोजन केले असल्याचा आरोप करत प्रेक्षक गॅलरी न उघडण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला होता 

या पाश्र्वभूमीवर विरोधकांनी सभेत गोंधळ घातला होता , तसेच आमदार अतुलबाबा भोसले यांनी आणलेला विकास निधी जाणून बुजून वापरला जात नसल्याचे आरोप देखील यावेळी करण्यात आले होते , तसेच यावेळी शहरातील विविध विषयांवर ती देखील चर्चा गाजली होती , त्यानंतर लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह कराड येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाची सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा उद्देश व कराड शहराला बदनाम करण्याचा जो हेतू होता व प्रेक्षक गॅलरीत जे लोकं बसणार होते ते गुंड प्रवृत्तीचे होते अशी जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता 

त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी दिनांक सात ऑगस्ट रोजी कराड नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर व सर्व विरोधी नगरसेवक यांनी शासकीय विश्राम गृह कराड येथे पत्रकार परिषद आयोजित करून नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराडच्या सुजाण नागरिकांना गुंड प्रवृत्तीचे लोक असं म्हटलं ते त्यांना शोभते का ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी केला… प्रेक्षक गॅलरीत आलेले जे लोक होते ते सोमवार पेठेतील नागरिक होते तसेच क्रीडाई ची मुले होती त्यांनाच तुम्ही गुंड म्हणता..

या वेळी बोलताना वाटेगावकर यांनी कराड शहराच्या विकासासाठी जो काही निधी मा. आमदार अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली येत आहे तो निधी शहराच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे, विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत , विरोधाला विरोध न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जी काही मदत लागेल त्या साठी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुमच्या बरोबर आहोत , परंतु चुकीच्या कामाला आमचा विरोध राहिल , असेही त्यांनी स्पष्ट केले , या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक व कराड शहरातील पदाधिकारी उपस्थित होते !

माय मराठी टीव्ही च्या पुढील भागात पहा विकास निधी / आरोप – प्रत्यारोप अशा सुरू असलेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नाट्यमय घडामोडी मध्ये शहरातील नागरिकांच्या समस्यांचा तसेच पालिकेच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष गटाने कितपत विचार केला आहे व काय आहेत नागरिकांच्या समस्या कशा पद्धतीने नगरपरिषदेचा कर बुडवला जातो आणखीन बरेच काही पुढील भागात सविस्तर…

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!