सातारा जिल्ह्यातील सुपुत्र डॉ.जयदीप रोकडे यांचा जागतिक स्तरावर सन्मान..
एज्युकेशन अवार्ड २०२६ ने सन्मानित.शुभेच्छांचा वर्षाव..

सातारा जिल्ह्यातील सुपुत्र डॉ.जयदीप रोकडे यांचा जागतिक स्तरावर सन्मान..
एज्युकेशन अवार्ड २०२६ ने सन्मानित.शुभेच्छांचा वर्षाव..
कराड प्रतिनिधी :- या बाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश राज्यातील बरेली येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.जयदीप रोकडे यांना कॅनडा येथे आयोजित २७ व्या विश्र्व काँग्रेसमध्ये जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा एज्युकेशन अवार्ड २०२६ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.जयदीप रोकडे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील पारगाव तालुका खटाव येथील रहिवाशी असून ते उत्तर प्रदेशातील बरेली येथील केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्था येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहेत. कुक्कुटपालन शिक्षण आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल विश्र्व कुक्कुट विज्ञान संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो.जागतिक स्तरावर बहुमान मिळवणारे डॉ.जयदीप रोकडे हे आशिया खंडातील पहिले शास्त्रज्ञ ठरले आहेत.या अवार्ड मध्ये १५००० हजार अमेरिकन डॉलर्स ( अंदाजे १२.५ लाख रुपये ) व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.बरेली येथील संस्थेमार्फत ग्रामीण भागातील ४००० महिलांना व २५०० तरुण युवकांना गेल्या पाच वर्षांत कुक्कुटपालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, जैव सुरक्षा,रोग व्यवस्थापनाचे थेट प्रशिक्षण दिले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.ग्रामीण रोजगारामध्ये कुक्कुटपालन प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रसारामुळे ग्रामीण भागात २०० हुन अधिक नवीन व्यावसायिक कुक्कुटपालनात उभे केले आहेत. अंड्याची नासाडी रोखण्यासाठी एग शिल्ड हे नवे तंत्रज्ञान डॉ.रोकडे यांनी विकसित केले आहे.कमी अंडी देणाऱ्या किंवा अंडी न देणाऱ्या देशी कोंबड्यांच्या चिकन पासून चिकन वडी हे अत्यंत स्वस्त आणि सहा महिन्यांपर्यंत टिकणारे प्रथिन युक्त उत्पादन विकसित केले आहे.ग्रामीण भागातील कुपोषण मुक्तीसाठी हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. त्या साठी भारत सरकार कडे या उत्पादनाच्या पेटंट साठी तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. पेटंट मंजुरी नंतर हे चिकन वडीचे तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनासाठी उद्योजकांना दिले जाणार आहे.
डॉ.जयदीप रोकडे हे आशिया खंडातील पहिले पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ असून युवा संशोधक म्हणून जागतिक स्तरावरील एज्युकेशन अवार्ड २०२६ ने त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. रोकडे यांना २०२५ मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथे २३ व्या राष्ट्रीय परिषदेत नॅशनल अकॅडमी ऑफ व्हेरनरी सायन्सेस च्या वतीने त्यांना यंग सायंटिस्ट अवार्ड देऊन गौरविण्यात आले होते. कुक्कुटपालन क्षेत्रातील शास्त्रज्ञ म्हणून उत्कृष्ट संशोधनासाठी परिस येथे जागतिक कुक्कुटपालन परिषदेने युवा संशोधक म्हणूनही गौरविण्यात आले होते. जागतिक स्तरावरील एज्युकेशन अवार्ड २०२६ चा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण देशातून व पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून डॉ.जयदीप रोकडे यांच्यावर शुभेच्छांचा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.




