E-Paper

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल लिगल केस आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांसह पोलीसांचीही पिळवणूक..

अनेक प्रस्ताव प्रलंबित.... याकडे लक्ष देणार कोण ?

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल लिगल केस आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांसह पोलीसांचीही पिळवणूक..

अनेक प्रस्ताव प्रलंबित…. याकडे लक्ष देणार कोण ?

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राहुल जाधव हे पर्यायी व्यवस्था करणार का ?

कराड प्रतिनिधी :-  या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अपघाती केसेस इतर पोलिसांना लागणाऱ्या मेडिकल लिगल केसेस याचे प्रमाणपत्र हे कोर्टात सादर करण्यासाठी आवश्यक असताना गेल्या एक महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने ते प्रमाणपत्र व इतर पोस्ट मार्टम रिपोर्ट हे महिनाभरापासून प्रलंबित आहेत.

तसेच विवाह नोंदणी प्रस्ताव सुद्धा हे एक महिन्यापासून प्रलंबित आहेत त्यामुळे नागरिकांसह पोलीसांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महिनाभरात दोनशे हुन अधिक विवाह नोंदणी प्रस्ताव प्रलंबित आहेत शिवाय मेडिकल लिगल केस चे किती तरी प्रमाणपत्र कोर्टात सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत

यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राहुल जाधव हे पर्यायी व्यवस्था करणार का. असा सवाल याठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे

तरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राहुल जाधव यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरीकांची व पोलिसांची गैरसोय दूर करावी यासाठी माय मराठी टीव्ही पाठपुरावा करणार आणि नागरिकांसह पोलीसांचा सुद्धा ताण कमी करण्यास मदत करणार. !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!