E-Paper

रचनात्मक आणि शाश्वत आंबेडकर चळवळ नव्या तरुण पिढीसाठी गतिमान करण्यासाठी कूती आराखडा बैठकीचे आयोजन -विद्याधर गायकवाड  

कराड

रचनात्मक आणि शाश्वत आंबेडकर चळवळ नव्या तरुण पिढीसाठी गतिमान करण्यासाठी कूती आराखडा बैठकीचे आयोजन — विद्याधर गायकवाड 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, देशात, राज्यात व सातारा जिल्ह्यात विशेषतः कराड तालुक्यातील आंबेडकरी चळवळ ही दिशाहीन झालेली आहे. कोण कुणाचे नेतृत्व मानायला तयार नाही, देशात, राज्यात विविध प्रश्न आहेत पण या वर कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना बोलायला तयार नाही. म्हणून नवी तरुण नेतृत्व पुढे येऊन त्याचे नेतृत्व करावे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मधूनच व्यक्त होत असल्याने,एक संकल्पना व शाश्वत आणि रचनात्मक आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी कराड शहर व तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची कूती व आराखडा बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक विद्याधर गायकवाड यांनी दिली.

चळवळीतील सद्य स्थितीतील आव्हाने आणि नव्या पिढीसोबत संवाद, विचार, मंथन ,एकजूटीने संघर्ष, संघटन आणि सामाजिक परिवर्तन व पुढील दिशा व जबाबदाऱ्या या विषयावर रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत पुणे बेंगलोर हायवे रोड पाटण तिकाटणे येथील हाँटेल पॅलेस मल्टीप्रपज येथे या बैठकीचे आयोजन केले आहे ‌ तरी या बैठकीसाठी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी बैठकीच्या अगोदर एक तास उपस्थित रहावे असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!