E-Paper

समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना पुरस्कार जाहीर

समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड

समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना पुरस्कार जाहीर

कराड प्रतिनिधी — आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड यांना सातारा येथील जयभीम फेस्टिवल च्या वतीने किशोर तपासे भाऊ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१३-१४ चा समाज भूषण पुरस्कार तात्कालीन राज्यपाल के.शंकर नारायण यांच्या हस्ते देण्यात आला होता.

सातारा येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या जयभीम फेस्टिवलच्या वतीने आंबेडकरी चळवळीत पस्तीस वर्षे पेक्षा जास्त काळ काम केलेल्या कार्यकर्त्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

यावर्षी कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठान चे संस्थापक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड यांना रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी सातारा येथे खा. उदयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आप्पासाहेब गायकवाड यांनी केलेल्या कामाची दखल विवीध संस्थेने घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!