लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.श्री.बाळासाहेब व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), यांनी केले.

यावेळी बोलताना मा.बाळासाहेब पाटील म्हणाले की, प्रभाग क्र.15 मध्ये एका उमेदवासासाठी मतदान होणार आहे, यामध्ये अख्तर अंबेकरी हे लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी मधून निवडणूक लढवत आहेत. शहरामध्ये आपण संघटितपणे निवडणूकीला सामोरे गेलो, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी प्रभाग क्र.१५ मध्ये प्रचार करून आघाडीचे उमेदवार अख्तर अंबेकर यांना विजयी करूयात असे आवाहन केले.
राजेंद्र यादव म्हणाले की, अंबेकरी यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रचार करावा, जो अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवली, त्या प्रमाणे कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवूया.
आभार नंदकुमार बटाणे यांनी मानले
याप्रसंगी चंद्रकांत हिंगमीरे, ऍड.मानसिंगराव पाटील, अल्ताफ शिकलगार, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇👇 येथे क्लिक करा