सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ.राहुल जाधव
स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ.राहुल जाधव
सातारा प्रतिनिधी : — या बाबत अधिक माहिती अशी की, स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांचे निलंबन झाल्याने गेली आठ दिवस रिक्त असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल जाधव यांची अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथील सहसंचालक प्रशासन श्री.राजेंद्र भालेराव यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशत म्हटले आहे की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांचे निलंबन झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार डॉ. राहुल जाधव यांचेकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. राहुल जाधव हे आपल्या पदाचा पदभार लवकरच स्विकारतील व जिल्हा रुग्णालयाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




