E-Paper

२४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपूर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

 

२४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपूर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

रहिमतपूर प्रतिनिधी  :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रहिमतपुर पोलीस ठाणे हददीतील बारीव गांवी राहणारे आर्मी जवान श्री. धनंजय संतोष पोळ, हे दिनांक २६/०८/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास त्यांचे घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत आंघोळीला गेले होते. आंघोळीला जाण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून तेथील टेबलवर ठेवली होती. त्यानंतर ते शेतातील कामासाठी निघून गेले. दुपारी ०२:०० वाजता ते शेतातून परत आले असता टेबलवर ठेवलेली सोन्याची चेन जागेवर मिळून आली नाही. सदरची सोन्याची चेन घरात शोध घेऊनही मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिले फिर्यादीवरून रहिमतपूर पोलीस ठाणे गु.र.नं.१३४/२०२६ BNS कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरबाबत मा.पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अज्ञात चारट्यांचा व चोरीस गेले मालाचा शोध तपास घेण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

सुट्टीवर आलेल्या जवानाच्या घरात चोरी झाल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. विनोद नेवसे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच, एक विधिसंघर्षित बालक चोरी केलेली सोन्याची चेन सराफाला विक्री करण्यासाठी घेऊन आल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक सोनारांकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून सदर अल्पवयीन मुलास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. सदर विधिसंघर्षीत बालक यांचे ताब्यातुन फिर्यादी यांची १६ ग्रॅम वजनाची सु.२,००,०००/- रुपये किंमतीची गोल कड्यांच्या डिझाइनची सोन्याची चेन गुन्ह्याचे कामी हस्तगत करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून गुन्ह्याचा छडा लावला व संपूर्ण १०० % मुद्देमाल जप्त केला. संबंधित विधिसंघर्षीत बालकावर बाल न्याय कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक, एम.एम.खान, सपोफौ/ जयराम पवार, दिपक जाधव, पो.हे.कॉ/१०२ बर्गे, पो.ना/१५३ शिंदे, पो.कॉ/७६०/तुषार काळंगे, पाकॉ/१०४९ अमर भोसले, पो.कॉ/१९११ समाधान देशमुख, महिला पो.कॉ/अर्पिता गायकवाड यांचे पथकाने सहभाग घेवुन सदरची कारवाई केलेली आहे. पोलिसांच्या या जलद व धडक कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

तसेच रहिमतपूर पोलीस ठाणे हददीतील स्थानिक सोनार यांनी दाखविलेली सतर्कता या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी बिल, पावती किंवा मालकीचा योग्य पुरावा नसलेले सोन्याचे दागिने, तसेच घाईघाईने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा तसेच चोरीचे इतर संशयास्पद साहित्य विक्री बाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रहिमतपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!