E-Paper

स्वातंत्र्य दिनी कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक 

कराड

स्वातंत्र्य दिनी कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक 

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती असे की आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम जाधव व पोलीस कॉन्स्टेबल मोहिते हे कराड येथील पोपट भाई पेट्रोल पंप सिग्नल वरती आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना रस्त्यावरती एक मोबाईल व पाचशे रुपये पडलेले दिसून आले त्यांनी क्षणाचाही विलंबना करता संबंधित युवकास थांबवून बोलावून घेतले व त्या युवकास त्याचा मोबाईल व पाचशे रुपये प्रामाणिकपणे ताब्यात दिले संबंधित युवक हा चिंचणी तालुका कडेगाव येथील असून त्या युवकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम जाधव व पोलीस कॉन्स्टेबल पी एस मोहिते यांचे कौतुक करत आभार मानले

वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिकपणाच्या या कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी कौतुक केले असून वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कराड शहरातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!