संविधान भवन व उर्दू शाळेसंदर्भातील स्वातंत्र्यदिनी होणारे सामूहिक आत्मदहन स्थगित
संविधान भवन आहे त्याच जागी नवीन मंजूर प्लॅन प्रमाणे बांधले जाणार

संविधान भवन व उर्दू शाळेसंदर्भातील स्वातंत्र्यदिनी होणारे सामूहिक आत्मदहन स्थगित
संविधान भवन आहे त्याच जागी नवीन मंजूर प्लॅन प्रमाणे बांधले जाणार
संविधान भवन व उर्दू शाळेबाबत नियमोचित कार्यवाही केले जाणार असल्याचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी दिले आंदोलकांना
सातारा नगररचना विभागाकडून संविधान भवन व उर्दू शाळेसह नव्याने रस्त्याच्या प्लॅनला मंजुरी
आंदोलकांना आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार
आंदोलक / पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यात चर्चासत्र व बैठक संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की संविधान भवन 2024 च्या मंजूर प्लॅन प्रमाणेच व्हावे कचरा डेपो शेजारी उर्दू शाळा बांधण्यात येऊ नये या मुद्द्यावर कराड तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते
या धरणे आंदोलनामध्ये अखिल आंबेकरी आनंदराव लादे झाकीर पठाण चंगेज खान आंबेकरी सुलतान काटापुरे आसिफ मुलानी तोफिक मुल्ला नईम पठाण रुस्तुम आंबेकरी अय्याज शेख अर्शद मुल्ला संदीप थोरात आदींनी सहभाग घेतला होता
तसेच याच विषयावरती स्वातंत्र्यदिनी कराड नगर परिषदेच्या प्राणांगणामध्ये सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील पालिका प्रशासनाला देण्यात आला होता
त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांच्या कार्यालयामध्ये संबंधित आंदोलक नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर तसेच नगरपरिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय गोडसे यांच्या उपस्थितीत संविधान भवना बाबत चर्चा करण्यात आली
यामध्ये आंदोलकांचे म्हणणे असे होते की संविधान भवन हे 2024 च्या मंजूर प्लॅनप्रमाणेच व्हावे तसेच उर्दू शाळा ही कचरा डेपो शेजारी होऊ नये यावरती उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारणा करून सद्य परिस्थिती विचारले असता मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर म्हणाले की संविधान भवन उर्दू शाळा व नव्याने होणाऱ्या रस्त्याबाबत सातारा नगररचना विभागाकडून परवानगी मिळाली असून त्यानुसारच कामकाज केले जाणार असून पालिका प्रशासन कोणत्याही प्रकारे यामध्ये चुकीचे काम करत नाही
त्यामुळे नागरिक म्हणून अथवा आंदोलक म्हणून संबंधित प्लॅन किंवा कामाबाबत नागरिकांना आंदोलकांना किंवा इतर कोणालाही आक्षेप असल्यास ते योग्य त्या ठिकाणी दाद मागू शकतात आपल्या हरकती दाखल करू शकतात ते प्रत्येकाचे स्वातंत्र्य व अधिकार आहे ,
सध्या फक्त संविधान भवनाचेच काम सुरू आहे उर्दू शाळेचे कामकाज अद्याप सुरू केलेली नाही , आणि जे काम सुरू आहे त्यामध्ये पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही आणि जर कोणास पालिका प्रशासन यामध्ये चुकीचे काम करत आहे असे वाटत असल्यास प्रत्येक व्यक्तीस संविधानिक अधिकार आहे त्याप्रमाणे ते योग्य त्या ठिकाणी दाद मागू शकतात
तसेच उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आपण जो सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे तो निर्णय तूर्तास मागे घेऊन आंदोलनापासून परावृत्त व्हावे तसेच आपल्या मागणीनुसार संविधान भवन व उर्दू शाळेबाबत नियमोचित कार्यवाही केले जाणार असल्याचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी दिले आंदोलकांना दिले असून
आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर नगर परिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी तसेच उपस्थित पत्रकारांच्या समोर मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते पत्र स्वीकारले असून उद्याचे सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून
उद्या स्वातंत्र्यदिनी कराड नगर परिषदेच्या प्राणांगणामध्ये सामूहिक आत्मदहन सारखा गंभीर प्रकार टाळला परंतु आता मात्र आंदोलकांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार का तसेच नवीन मंजूर प्लॅन प्रमाणे संविधान भवनाचे काम सुरू राहणार का असा सवाल मात्र या ठिकाणी उपस्थित झाला आहे ?





