जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निलंबन मागे घ्या… रिपाइं ची मागणी
अन्यथा जन आंदोलन छेडणार... जिल्हा अध्यक्ष संजय गाडे यांचा इशारा

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निलंबन मागे घ्या… रिपाइं ची मागणी
अन्यथा जन आंदोलन छेडणार… जिल्हा अध्यक्ष संजय गाडे यांचा इशारा
सातारा प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की,स्व.क्रांतिसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांना बेकायदेशीर रित्या निलंबन केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. याची खात्री करण्यासाठी जो तो ही बातमी एप्रिल फूल तर नाही ना याची खात्री करत होता. परंतु सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या कार्यासन अधिकारी यांच्या सहीच्या पत्राची खातरजमा केली असता तसा आदेश प्राप्त झाला होता. या निलंबन आदेशामध्ये फक्त कर्तव्यात कसूर केली असल्याचे म्हटले आहे व आपली विभागीय चौकशी करण्याचे योजिले आहे.
अशा प्रकारचा आदेश असून त्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट आक्रमक होऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांचे निलंबन हे राजकीय व जातीय दुष्टीकोनातून केलेलं आहे. असा आरोप करुन जिल्हाधिकारी मा.संतोष पाटील यांना निलंबन तातडीने मागे घेण्याबाबतचे निवेदन दिले. या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे, गणेश भिसे, शशिकांत गंगावणे, विशाल भाऊ कांबळे, चंद्रकांत दादा कांबळे, दत्तात्रय सावंत,बाबू वायदंडे,सनीभाऊ काटे, सिद्धार्थ वायदंडे, युवराज चांदणे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रति मा.राज्यपाल , आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, उपसंचालक, व पोलिस प्रशासनास पाठविले आहे.





