E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या अध्यक्ष पदी चौथ्यांदा राहुल भोसले यांची निवड 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या अध्यक्ष पदी चौथ्यांदा राहुल भोसले यांची निवड 

कराड प्रतिनिधी :– या बाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. परंतु कराड शहरात सालाबादप्रमाणे सर्व आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व बौध्द बांधव यांच्या वतीने कराड शहरात मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी केली जाते. त्या अनुषंगाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बुधवार पेठ येथे वार्षिक सभेचे आयोजन केले होते.त्या सभेचे अध्यक्ष जेष्ठ नेते व माजी नगरसेवक शांताराम थोरवडे होते. 

बैठकीपूर्वी जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष राहुल भोसले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तर बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरवडे यांनी बुद्ध वंदना घेऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली..

प्रथम सर्व महापुरुषांना राहूल भोसले यांनी अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले. 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने सन २०२५ ते २०२६ चा वार्षिक अहवाल कमेटीचे सचिव संतोष बोलके यांनी सादर करुन त्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवून व एकमताने मंजूरी दिली. त्यांनतर मागील वर्षीची कार्यकारी समिती बरखास्त करण्यात आली. व पुढील कामकाज मा. बैठकीचे अध्यक्ष मा.शांताराम थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पार पडले.यावेळी एकूण सहा विषयांवर चर्चा करण्यासाठी किरण थोरवडे यांनी विषय पत्रीकेवरील विषय उपस्थितांसमोर मांडून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आगामी जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष कोण व त्यांची निवड आताच करा अशी मागणी वाढल्याने जयंती उत्सव कमेटीच्या अध्यक्ष पदी राहुल भोसले यांचीच निवड करावी अशी मागणी जोर धरू लागल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली ‌ 

यावेळी आप्पासाहेब गायकवाड, संतोष थोरवडे, मिलिंद कांबळे, किरण कांबळे, संतोष थोरवडे, अशोक भोसले, यांनी चर्चेत भाग घेतला. या सर्वसाधारण सभेत बोलताना माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी कराड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिल्प जागृत ठेवण्यासाठी कराड तहसीलदार कार्यालयासमोर समोरील जागेत त्याची उभारणी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या मागणीस आप्पासाहेब गायकवाड यांनी समर्थन देता वेळी इतरही सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

यावेळी बौद्ध समाजातील उच्च शिक्षित डॉ. प्राध्यापिका स्व. सुषमा किर्तने यांचे अपघाती निधन झाले त्यांना या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे सुत्रसंचलन किरण थोरवडे यांनी केले तर शेवटी आप्पासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. या सभेत मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!