
अतिक्रमण हटाव मोहिमेनंतरच्या काही काळाची परिस्थिती
कृष्णा नाका ते दत्त चौक दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली परंतु काही वेळानंतर माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधीने त्याच एरियामध्ये फेरफटका मारला असता दत्त चौक येथे काही हार विक्रेते पुन्हा रस्त्यावर फ्रुट विक्रेते पुन्हा रस्त्यावर तर एसटी स्टँड समोर फळ विक्रेते पुन्हा रस्त्यावरती आपले दुकान मांडून बसले हे असे चित्र आणि परिस्थिती जर लगेचच पहावयास मिळाली तर मग अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी होणार का ? हॉकर्सधारकांचा प्रश्न मार्गी लागणार का ? काही आडमुट व्यवसायिकांच्यामुळे सर्वच हॉकर्स धारक अडचणीत येणार का ? अतिक्रमण हटाव मोहिमेची भीती व्यवसायिकांना राहणार का ? की पुन्हा दोन-चार दिवस उलटले की परिस्थिती जैसे थे पूर्वी होते तेच पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत ? असे आडमुटपणा करणाऱ्या व्यवसायिकांवर हॉकर्स संघटनेचे लक्ष असणे गरजेचे आहे , कारण अशा आडमुटपणामुळे सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक निर्णय होणे पुढे कठीण जाऊ शकते , त्यामुळे हॉकर्स संघटनांनी अध्यक्षांनी एकत्रित येत आडमुटपणा करणाऱ्या व्यवसायिकांना समजावून सांगणे गरजेचे आहे व पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हॉकर्सधारकांसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच पादचाऱ्यांना फुटपाथ रिकामे राहील अशा प्रकारे पुनर्वसन करण्याबाबत सकारात्मक दृष्टीने चर्चा करणे गरजेचे आहे




