E-Paper

कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा संपन्न 

कोल्हापूर

कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा संपन्न 

कराड प्रतिनिधी — या बाबत ची अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील शिक्षण महर्षी डॉ.बापूजी सांळूखे शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित व पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने ए एन एम,जी एन एम व बी एस सी नर्सिंग चा अभ्यासक्रम सुरू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आज सकाळी झालेल्या कोल्हापूर येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मूती भवन येथे मोठ्या उत्साहात शपथविधी कार्यक्रम पार पडला. 

    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालक डॉ. रेश्मा सुरज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    यावेळी बोलताना डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या की, आजच्या जो सोहळा आहे तो सोहळा म्हणजे आपण काहीतरी जबाबदारी घेतली आहे आणि मला समाजातील गोरगरीब जनतेसाठी सेवा करायची आहे या भावनेतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. परंतु आपण विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना ज्या आपल्या माय माऊली ने जसं आपल्यावर संस्कार केलेले आहे तसेच ते संस्कार आपण ज्या वेळी सिस्टर किंवा बद्रर म्हणून काम करु त्या वेळी आपण हि माझ्या आई वडिलांनी माझी जशी सेवा केली तशीच सेवा आपण इतरांची केली पाहिजे. असे परखड मत डॉ पवार यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी शुभांगी गावडे, कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या नर्सिंग अधिक्षक मिनाक्षी तांदळे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ कल्पना कांबळे उपप्राचार्य विशाल कुमार पवार, कार्यालयीन अधिकारी मिलिंद कुमार साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 

    कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून व स्वागत गीत सादर करून करण्यात आली. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!