
श्रीश्रुश्रेयस या नवीन वास्तूत जोशी दांपत्यांचा ग्रहप्रवेश उत्साहात संपन्न —
कराड प्रतिनिधी — सार्वजनिक आरोग्य विभागात सहायक कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत असणारे व मदतीचा हात देणारे श्री.श्रीनिवास गजानन जोशी यांनी कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथे बांधलेल्या नवीन वास्तूचा वास्तुशांती व ग्रहप्रवेश उत्साहात संपन्न झाला.
श्री.जोशी यांचे वडील श्री.गजानन विष्णू जोशी व आई सौ.विद्या गजानन जोशी यांच्या समवेत श्री.श्रीनिवास जोशी व त्यांच्या पत्नी सौ.श्रुती श्रीनिवास जोशी यांनी धार्मिक विधी सोहळा पार पाडला श्री.जोशी यांचा मुलगा कु.श्रेयस हा उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे असल्याने त्याने या सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितीथी दर्शवली.
कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथे स्वकष्टाने उभ्या केलेल्या वास्तूचा वास्तुशांती व गूहप्रवेश उत्साहात संपन्न झाला.
या ग्रह प्रवेशावेळी बहिण सौ.मूणाल ताटके, भाऊजी श्री.श्रीहरी ताटके, तसेच त्यांच्या परिवारातील विनायक दंडगे, राजेंद्र दंडगे राहुल दंडगे, ऋग्वेद दंडगे तसेच देशपांडे,शुक्ल परिवार व इनरव्हिल क्लबच्या महिला सदस्या व मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.श्रीनिवास जोशी यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि बहुजन समाज पार्टी चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे व त्यांची पत्नी सौ.पूनम किरण थोरवडे यांनी जोशी दांपत्य यांना उभयता टावेल टोपी घालून पोषाख सप्रेम भेट दिला.यावेळी विजय पट्टणशेट्टी,निलेश माने, संतोष शेटे, सोनवणे इत्यादी उपस्थित होते. शेवटी स्नेह भोजन करून जोशी दांपत्य यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.





