E-Paper

शेतकरी संघटनेचे नेते अनिल घराळ यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश

अनिलबापू घराळ यांनी धनुष्यबाण हाती घ्यावे यासाठी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांनी विशेष प्रयत्न केले

शेतकरी संघटनेचे नेते अनिलबापू घराळ यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश 

उद्या उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण घेणार हाती  

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की  शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते अनिल घराळ बापू उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत सातारा येथे शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे परिसरातील राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनिल घराळ बापू हे शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून सातारा जिल्ह्यात ओळखले जातात. 

त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने विविध आंदोलनांद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. 

आता त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रवेश सोहळा उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून मोठ्या संख्येने शेतकरी आणि समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  या प्रवेशासाठी सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू, कराड चे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी विशेष प्रयत्न केले.

या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!