E-Paper

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कराड येथे शिक्षक पालक यांची सहविचार सभा उत्साहात संपन्न 

कराड

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कराड येथे शिक्षक पालक यांची सहविचार सभा उत्साहात संपन्न 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की २६ जानेवारी हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून कराड येथील शिक्षक व पालक यांनी बुधवार पेठ येथील कराड नगरपालिकेची प्राथमिक शाळा नंबर दहा हि औट घटकेची ठरली असून ती शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करून पुन्हा नव्याने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या साठी शिक्षक व पालक यांची सहविचार सभा घेण्यात आली आणि या सभेत शाळा नंबर दहा कशी नव्याने सुरू करता येईल यावर विचार मंथन करण्यात आले. 

यावेळी या सभेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या सहविचार सभेत बुधवार पेठेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी या विविध स्पर्धा परीक्षा देऊन व पुढील शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत अशा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल संविधान प्रस्ताविका व पेन देऊन गौरवण्यात आले. 

या सहविचार सभेस कराड नगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आयु. रमेश कांबळे, प्रमुख मार्गदर्शक आयु. प्रकाश काशीळकर, समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, सामाजिक कार्यकर्ते निशांत ढेकळे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सहविचार सभेचे प्रास्ताविक राजकुमार लादे सर यांनी केले तर प्रास्ताविक प्रवीण लादे सर यांनी केले. या सभेस प्रमोद लादे, सुरेश कांबळे, किरण थोरवडे, किशोर आठवले, विजय काटरे,विजय थोरवडे, भारत थोरवडे,सागर पोलारकर, शिरीष लादे, संतोष रसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी किरण थोरवडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!