E-Paper

कराड च्या उपजिल्हा रुग्णालयासह राज्यातील सिटी स्कॅन सेवा ठप्प..

आरोग्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कराड च्या उपजिल्हा रुग्णालयासह राज्यातील सिटी स्कॅन सेवा ठप्प..

चार दिवसांपासून रुग्णांचे हाल.. खासगी रुग्णालयात बसतोय आर्थिक भुर्दंड.. आरोग्य मंत्री यांचे दुर्लक्ष ?  काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्या बरोबरच अपघात असेल किंवा अन्य आजाराने त्रस्त असेल अशा रुग्णांना सिटी स्कॅन करून त्यांचे निदान व्हावे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने खासगी क्रस्ना डायग्नोस्टिक या कंपनीशी भागीदारी तत्त्वावर संपूर्ण राज्यात सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

परंतु गेल्या दिड वर्षापासून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना थकीत बिल अदा केले नसल्याचे वास्तव समोर असताना सुद्धा ती कंपनी हि सेवा देत होती तरी सुध्दा राज्य सरकार एकीकडे कोणत्याही रुग्णांना उपचारा अभावी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला नाही याची हमी देत असताना मग गेल्या चार दिवसांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील आणि विशेषतः कराड च्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा बंद का याचे उत्तर सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर देतील का…

या बाबत आमच्या माय मराठी टीव्ही न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी यांनी मंत्री महोदय यांना तीन दिवसांपूर्वी फोन करून याची माहिती दिली असता त्यांनी माझ्या नंबरवर टेक्स्ट मेसेज करा मी कार्यवाही करतो त्या प्रमाणे आमचे प्रतिनिधी यांना टेक्स्ट मेसेज पाठवून दिला परंतु आजपर्यंत मंत्री महोदय यांचा आमच्या प्रतिनिधीला साधा मेसेज सुद्धा आलेला नाही. आमचे प्रतिनिधी फक्त मंत्री महोदय यांनाच फोन करत नव्हते तर ते जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ राहुल जाधव आणि कराड दक्षिण विधानसभेचे आमदार श्री. डॉ. अतुल बाबा भोसले यांना सुध्दा फोन द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते.

परंतु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राहुल जाधव हे नेहमीच फोन घेण्याचे टाळतात. परंतु कराड दक्षिण विधानसभेचे आमदार यांचे पीए श्री.अमोल पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने फोन करून संपर्क साधला असता त्यांनी मा. आमदार महोदय यांना आपली प्रतिक्रिया व सूचना लगेच सांगू . असे आश्र्वासन देऊन फोन कट केला गेला.

काहीही करा कुणाला जरी फोन करा तरी उत्तर फक्त एकच आहे माहिती घेऊन सांगतो.. जर अशा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सिटी स्कॅन सेवा रुग्णांसाठी बंद असेल तर सर्व सामान्य माणसांनी जायचं कुठे.. याचा जाब विचारला जाण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिक सुद्धा या विरोधात आंदोलन करतील याची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री महोदय व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!