E-Paper

मावा गुटखा विक्रेत्यांचा प्रवास आता चक्क गाडीच्या डिक्कीतुन 

 मावा गुटखा विक्रीसाठी दुचाकीच्या डिक्कीचा वापर 

मावा गुटखा विक्रेत्यांचा प्रवास आता चक्क गाडीच्या डिक्कीतुन 

मावा गुटखा विक्रीसाठी दुचाकीच्या डिक्कीचा वापर 

मावा विक्रेत्यांनी तर चक्क ग्रह उद्योगच सुरू केला

प्रोडक्शन घरात विक्री मात्र गाडीच्या डिक्कीत… एक्सेस गाडीची सर्वाधिक पसंती  

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी श्री तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरांचे तसेच अवैध मावा गुटखा विक्रेत्यांचे पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत कारण पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाकाच लावला आहे ,

यातच माय मराठी टीव्ही ने देखील कराड शहरासह तालुक्यातील सद्य परिस्थिती व वस्तुस्थिती पुराव्यासह प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल ताबडतोब घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवार दिनांक नऊ सहा 2026 रोजी कराड मधील साईबाबा मंदिर शेजारील एका वेल्डिंग दुकानातील मावा विक्रेत्यावर विविध कलमान्वये कारवाई करत कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला सदरच्या मावा विक्रेत्याला अटक देखील झाली सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे ,

तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कराडमध्ये दाखल झाले आहेत याची माहिती लागताच अनेक मावा व गुटखा विक्रेत्यांनी आपला हा अवैध व्यवसाय बंद न करता अन्न व औषध प्रशासन विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ,

जाणून घेऊयात मावा व गुटखा विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची दिशाभूल करण्याकरिता काय नवीन फंडा वापरला आहे ?

पूर्वी शहरासह तालुक्यातील अनेक टपऱ्यांमध्ये तसेच अनेक दुकान गाळ्या मध्ये वेळप्रसंगी अगदी किराणा मालाच्या दुकानांमध्ये थाटामाटात झगमगाट फ्लेक्स बोर्ड लावत , स्पेशल मावा,कत्री मावा, अशा आशयाचे बोर्ड लावून सर्व काही खुलेआम पणे करणारे हेच मावा व गुटखा विक्रेते आता रूप बदलून आपला व्यवसाय करू लागले आहेत ,

यामध्ये प्रामुख्याने मावा विक्रेत्यांनी घरातच मावा तयार करून त्याच्या पुड्या बनवून ठेवण्याचे काम सुरू केले आहे , तयार केलेला हा मावा गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून सर्वप्रथम सर्व ग्राहकांना सूचना देऊन आपल्या दुकानाच्या समोर गाडी लावून बसत आहेत

ग्राहकांना सक्त सूचना आणि ताकीद केलेली आहे की पैसे अगोदरच ऑनलाईन मारायचे रोख रक्कम द्यायची नाही , आणि मग ग्राहक जवळ येतात इकडे तिकडे बघून हळूच गाडीच्या डिकीतून पुडी काढून द्यायची , आणि अचानक जर काय संशयास्पद हालचाली वाटल्याच तर मग गाडीला स्टार्टर मारायचा आणि पुढील चौकात जाऊन थांबायचे आणि मग चौकात विक्री सुरू , गुटखा विक्रेत्यांनी देखील आपल्या दुकानांमध्ये गुटका न ठेवता अशाच प्रकारे गाडीच्या डिक्कीमध्ये गुटखा ठेवून विक्री चालू ठेवली आहे ,

यांच्या या सर्व हालचालींचे पुरावे माय मराठी टीव्हीकडे उपलब्ध आहेत तसेच माय मराठी टीव्ही पूर्वीपासूनच कोणत्याही प्रकारचे पुरावे असल्याशिवाय वृत्त प्रसिद्ध करत नाही , हे सर्वांना अवगतच आहे  

आता अन्न व औषध प्रशासन विभाग या कराड शहरासह तालुक्यातील छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मावा व गुटखाविक्रेत्यांपर्यंत कसे पोहोचणार ? यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला काय काय कसरती कराव्या लागणार ? यांना पुरवठा करणाऱ्या रॅकेट पर्यंत कसे पोहोचणार ? तसेच नुकतेच काल दिनांक 12/6/2026 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की पान मसाला गुटखा मावा विक्रेता यांच्या वरती आता थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , त्यामुळे आता कराड शहरासह तालुक्यातील मावा गुटखा पान मसाला विक्रेत्यांपैकी कोणाचा नंबर लागतो याकडे कराड शहरासह तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून लागले आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!