यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्यादित रेठरे बु तालुका कराड संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ अपडेट्स
दिनांक २२ मे २०२६ रोजी तीन वाजे पर्यंत एकूण ५१ नामनिर्देशन पत्र दाखल

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्यादित रेठरे बु तालुका कराड संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ अपडेट्स
आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक २२ मे २०२६ रोजी तीन वाजे पर्यंत एकूण ५१ नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत.
गट /मतदार संघ निहाय नामनिर्देशन पत्र दाखल संख्या
१. गट क्रमांक १ – वडगाव हवेली दुशेरे मधून ७ नामनिर्देशन दाखल
२. गट क्रमांक २ -काले कर्वे मधून ६ नामनिर्देशन पत्र दाखल
३. गट क्रमांक ३ – नेर्ले तांबवे मधून ७ नामनिर्देशन पत्र दाखल
४. गट क्रमांक ४ – रेठरे हरणाक्ष बोरगांव मधून ८ नामनिर्देशन पत्र दाखल
५. गट क्रमांक ५ – येडे मच्छिंद्र मधून ७ नामनिर्देशन पत्र दाखल
६. गट क्रमांक ६ – रेठरे बुद्रुक मधून ६ नामनिर्देशन पत्र दाखल
७. महिला राखीव मधून ३
८. ओबीसी मधून २
९. अनुसूचित जाती जमाती २
१०. विमुक्त जाती /भटक्या जमाती /विमाव ३
आज अखेर १३९ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक २५.५.२०२६ रोजी होणार आहे. राखीव प्रवर्गातील नामनिर्देशन पात्रांची छाननी प्रथम होणार असून सर्वसाधारण ऊस उत्पादक सभासद मतदार संघांतील नामनिर्देशन पत्रांची छाननी गट क्रमांका नुसार होणार आहे. सदर छाननीस उमेदवार किंवा सूचक यापैकी एकास उपस्थित राहता येणार आहे. नामनिर्देशन पत्रावरील आक्षेप लेखी स्वरूपात पुराव्यासह घेणे आवश्यक आहे.




