E-Paper

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

कराड

 

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

कराड प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय तसेच काँग्रेसचे सक्रिय नेते नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीच नामदेव पाटील यांच्याकडे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अल्पावधीतच त्यांनी संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी प्रभावी काम करत आपला ठसा उमटवला. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व करत पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी केले. तसेच कराड पंचायत समितीच्या वारूंजी गणात रवींद्र बडेकर यांना विजयी करून या भागातील काँग्रेसचे वर्चस्व अधिक मजबूत केले.

गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी नामदेव पाटील यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नामदेव पाटील म्हणाले की, “सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.”

राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात शून्यातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ५३ वर्षीय नामदेव पाटील यांनी वारूंजी गावचे सरपंच, कराड पंचायत समिती सदस्य, वीट भट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत.

त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!