
भीम आर्मीच्या वतीने कराड तालुका पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप यांचा सत्कार
चोवीस तासात गुन्हा उघडीस आणुन आरोपीतास मालासह केली होती अटक
कराड प्रतिनिधी :- याबाबत माहिती अशी की तक्रारदार हे दि. 16/05/2026 रोजी रात्रौ 12.00 वा. चे सुमारास साकुर्डी ता. कराड येथील एच.पी.पंपा नजीक त्याचे कार मध्ये थांबले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याचेशी बोलण्यास सुरुवात करुन हातचलाकीने त्याचे ताब्यातील 4,53,628/- रुपये किंमतीची सोन्याची तसेच चांदीचे दागिणे असलेली बॅग चोरुन नेहली होती. म्हणुन वगैरे तक्रारीवरुन कराड तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 292/2026 BNS 303, (2) सदरचा गुन्हा दिनांक-16/05/2026 रोजी दाखल करणेत आला होता !
सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील साो. कराड व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप सो यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या !
दिनांक 17/05/2026 रोजी दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने मा. वरिष्ठांच्या सुचने नुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सखाराम बिराजदार तसेच डी.बी पथक पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदारांकडुन बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील आरोपीत हा सदर गुन्हयात चोरी केलेले दागिणे हे मौजे वाठार ता. कराड येथे विक्री करणेकरीता घेवुन फिरत आहे,
म्हणुन मिळालेल्या बातमीप्रमाणे डी.बी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सखाराम बिराजदार व त्यांच्या स्टाफने सदर ठिकाणी जावुन आरोपीतास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव संतोष सदाशिव यादव वय. 34 वर्षे रा. तळमावले ता. पाटण जि. सातारा असे सांगितले !
तसेच त्याचेकडुन सदर गुन्हयात त्याने चोरी केलेले 4,53,628/- रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिणे जप्त करणेत आले आहेत, तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास जी. एन. वेदपाठक पोलीस हवालदार.ब.नं.244 हे करीत आहेत !
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे सोो, तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील साो. कराड व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, ढेबेवाडी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण, सहाय्यक फौजदार नितीन येळवे, सहाय्यक फौजदार विठ्ठल खाडे, पोलीस हवालदार वेदपाठक, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस नाईक किरण बामणे, पोलीस शिपाई/ किरवे (ढेबेवाडी पोलीस ठाणे) यांनी केली होती
त्याबद्दल भीम आर्मी सातारा जिल्हा च्या वतीने कराड तालुका पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र जगताप यांचा आज सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार करताना भीम आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण काळोखे जिल्हा महासचिव शंकर सोनवणे पाटण तालुकाध्यक्ष संतोष थोरात कराड शहराध्यक्ष जुनेद मोमीन दत्ता कांबळे अविष्कार भागवत आनंदा साळुंखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते




