
मावा / गुटखा विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई व कारवाईत सातत्य गरजेचे
माय मराठी टीव्ही प्रतिनिधी :- याबाबत माहिती अशी की सध्या शहरासह परिसरामध्ये मावा / गुटखा विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई व कारवाईत सातत्य असणे गरजेचे वाटते ,
जाणून घेऊयात माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून का व कशासाठी
सध्या शहरासह परिसरातील परिस्थिती पाहिली तर अगदी खुलेआम पणे भर नागरी वस्तीमध्ये शाळेजवळ महाविद्यालयाजवळ मंदिराशेजारी अगदी गल्लीबोळा मध्ये सुद्धा मावा व गुटख्याची खुलेआमपणे बिनधास्त विक्री सुरू आहे ,
एखाद्या व्यक्तीची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा प्रसिद्धी माध्यमातील एखाद्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्यास कारवाया केल्या जातात , यामध्ये सर्वात प्रथम पोलीस प्रशासनाकडून कारवाया केल्या जातात , अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केल्यासारखे होते कारण अन्न व औषध प्रशासन विभाग फारसे गांभीर्याने याकडे लक्ष देताना दिसत नाही , कोणाच्यातरी तक्रारीवरून किंवा सांगण्यावरून केव्हातरी यायचं आणि एखादी कारवाई करून जायचं , हे असे चित्र सध्या शहरासह परिसरामध्ये दिसून येत आहे ,
प्रभावी कारवाई व कारवाई मध्ये सातत्य गरजेचे हे सांगण्या मागचे उद्दिष्टे एवढेच आहे की कारवाया करून देखील दुसऱ्या दिवशी आहे त्याच ठिकाणी अगदी बिनधास्तपणे जणू काही सर्व मान्यताप्राप्त असल्यासारखे चित्र दिसून येते , अगदी निर्भीडपणे कोणाही भीती अथवा तमा न बाळगता हे मावा व गुटखा विक्रेते आपला व्यवसाय थाटामाटाने करताना दिसून येतात ,
आणि मग नागरिकांमधून प्रशासनाच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चेला उधान येते नेमके काय चाललय ? कारवाई करून साध्य काय झाले ? कारवाई केल्यानंतर नेमका बदल काय झाला ? प्रशासनाची आता भीती उरली आहे की नाही ? प्रशासनाची या व्यवसायिकांवर वचक उरली आहे की नाही ? हे विक्रेते खुलेआमपणे थाटामाटात आपला व्यवसाय कोणाच्या जोरावरती करू लागले आहेत ?
पूर्वीच्या तत्कालीन काही अधिकाऱ्यांनी व्यसनमुक्त शहरासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या त्यामध्ये ड्रग फ्री मॅरेथॉन देखील घेण्यात आली होती , आत्ता शहरासह परिसरामध्ये दिसून येणाऱ्या सद्य परिस्थिती वरती देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे अशा अनेक चर्चा आता नागरिकांमधून होताना दिसून येत आहेत !
नागरिकांमधून होणाऱ्या या चर्चा व सहज शहर व परिसरात फेरफटका मारून पाहिलेली परिस्थिती यामध्ये साम्य दिसून येत आहे
आज इथेच थांबूया पुन्हा क्रमशा सविस्तर माहितीसह भेटू






