E-Paper

आंधळ्या प्रेमाने केला घात एकाचा जीव गेला तर दोघांचे आयुष्य झाले बरबाद

आंधळे प्रेम

आंधळ्या प्रेमाने केला घात 

एकाचा जीव गेला तर दोघांचे आयुष्य झाले बरबाद

जाणून घेऊयात पोलिसांकडून मिळालेले अधिकृत माहिती व संपूर्ण हकीकत 

अपघाताचा बनाव करुन अभियंत्याचा खुन करणारे दोन कॉन्ट्रॅक्ट किलर (सुपारी बहाद्दर) यांना कराड शहर पोलीसांकडून अटक 

कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजी. नंबर 656/2026 भा.न्या.सं. सन 2023 चे कलम 103(1), 311 प्रमाणे नोंद आहे.

सदर गुन्हयामध्ये दि. 6/06/2026 रोजी नमुद प्रकरणातील मयत नामे लक्ष्मण श्रीरंग मंडले, वय 54 वर्षे, व्यवसाय सरकारी नोकरी (जलसंधारण अभियंता, शहापूर जि.ठाणे) मूळ राहणार मनव ता. कराड जि. सातारा यांचे अंगावर दि. 6/06/2026 रोजी पहाटेच्या वेळी अल्टो कार घालुन त्यास चिरडून जीवे ठार मारलेले होते.

सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासकामी मयताची पत्नी सारिका लक्ष्मण मंडले व तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यास दि. 6/06/2026 रोजी दाखल गुन्हयामध्ये सायंकाळी अटक केलेले होते.

नमुद दोन्ही आरोपीतांस दि. 12/06/2026 रोजीपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केलेले आहे. नमुद गुन्हयातील अटक महिला मयताची पत्नी सारिका लक्ष्मण मंडले हिचेकडे तपास केला असता तपासात असे निष्पन्न् झाले की,

मयत लक्ष्मण श्रीरंग मंडले हा तिला त्रास देत असल्याने तिने तिचे सन 2023 पासुन आरोपी नामे प्रथमेश प्रकाश थोरात, वय 25 वर्षे, राहणार कार्वे ता. कराड जि. सातारा याचेसोबत प्रेमसंबंध होते. मयत लक्ष्मण हा त्रास देत असल्याने आरोपी सारिका हिने त्याचा खून करण्याचा कट रचून त्याचे खुनाची सुपारी आपला प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात व त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे, वय 23 वर्षे, राहणार कल्पतरु कॉलनी, श्रीराम अपार्टमेंटजवळ, थोरात हॉस्पिटलजवळ, कार्वे नाका, कराड जि. सातारा यांना दिली.

कॉन्ट्रॅक्ट किलर याने मयत यास चारचाकी गाडीने पाठीमागुन उडवुन त्याला जीवे ठार मारण्याचे ठरले. त्यानुसार प्रियकर आरोपीत प्रथमेश थोरात व त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे या दोघांनी एक अल्टो चारचाकी गाडी खरेदी केली.

त्यानंतर दि. 5/06/2026 रोजी मयत लक्ष्मण मंडले यांनी सुट्टीकरता ते ठाणे येथून येत आहेत असे रात्रो 10:30 वाजता पत्नीस सांगितले. तो ट्रॅव्हल्सने ठाणेहुन कराड येथे आला. पत्नी सारिका ही पहाटे 04:00 वाजल्यापासुन पतीला वारंवार फोन करुन त्याचे लोकेशन घेत होती. व सदरचे लोकेशन आपला प्रियकर प्रथमेश थोरात याला दिले.

पती लक्ष्मण मंडले हे पहाटे 05:20 वाजता कोल्हापुर नाका कराड येथे उतरल्यानंतर पत्नीला फोन करुन सांगितले की. मी पायी चालत येत आहे. सदरची माहिती पत्नीने कॉन्ट्रक्ट किलर प्रथमेश थोरात व आकाश अशोक होनसुरे यांना दिल्याने त्यांनी शिंदे हॉस्पिटलचे समोर अभियंता मंडले हे पायी जात असताना त्यांना अल्टो कारने पाठीमागून धडक देऊन त्यास चिरडून जीवे ठार मारुन त्याचेजवळील बॅग व मोबाईल् फोन घेऊन पळुन गेले. मयत हे अर्धवट जिवंत असल्याची शंका वाटल्याने त्यांनी पुन्हा थोड्यावेळाने परत येऊन त्यांना चिरडून जीवे ठार मारुन सदर ठिकाणाहुन फरार होऊन गुन्हयाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास तपासी अधिकारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, सह तपास अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे, पोलिस उप निरीक्षक निखील मगदूम, दिपक वागवे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपुर्ण पथक यांनी आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण, फॉरेन्सिक इव्हिडन्स यांचा अभ्यास करुन दि. 7/06/2026 रोजी यातील कॉन्ट्रॅक्ट किलर (सुपारी बहाद्दर) प्रथमेश थोरात व त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांना कार्वे व बैल बाजार रोड कराड येथुन रात्री उशिरा अटक केले आहे.

नमुद दोन्ही आरोपीत यांना दि. 8/06/2026 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दि. 12/06/2026 रोजीपर्यंत पोलिस कोठडी आदेशित केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, कराड शहर पोलिस ठाणे व त्यांची टीम करत आहे.

तपास पथक :- मा. पोलीस अधिक्षक सो श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडूकर मॅडम,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, सहा. पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय गोडसे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. अशोक भापकर, श्री. निलेश तारु, श्रीमती श्रध्दा आंबले, श्रीमती जयश्री वाघमोडे, पोलिस उप निरीक्षक श्री. निखील मगदूम, श्री. दिपक वागवे, श्री. कृष्णा डिसले, श्रीमती शितल पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड कडील पोलिस अंमलदार अशोक वाडकर, सतीश पाटील, संदिप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, निलेश विभुते, अमोल देशमुख, महेश पवार, अमित चव्हाण, सोनाली पिसाळ, पूनम सावंत सर्व नेमणुक कराड शहर पोलिस ठाणे हे करत आहेत

या संपूर्ण प्रकारबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाना दिलेली माहिती व्हिडीओच्या माध्यमातून पाहण्यासाठी 👇👇👇👇👇👇👇👇 येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!