E-Paper

श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक 2026 निमित्त दिनांक 20.04.2026 रोजी कराड शहरातील वाहतूक मार्गात  दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत बदल 

मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक 2026 निमित्त दिनांक 20.04.2026 रोजी कराड शहरातील वाहतूक मार्गात  दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत बदल 

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरात शिवजयंती (परंपरेने) ही दिनांक-20/04/2026 रोजी असून ती मोठया उत्साहात साजरी केली जाते. सदर जयंती निमित्त दिनांक-20/04/2026 रोजी 14.00 ते रात्रौ 22.00 वा. चे दरम्यान कराड शहर हद्दीत भव्य दरबार मिरवणूक आयोजित करणेत येते. सदरची मिरवणूक ही पांढरीचा मारुती मंदीर-जोतिबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-दर्गा मोहल्ला-चावडी चौक-नेहरू चौक-आझाद चौक-यशवंत हायस्कूल-दत्त चौक पर्यंत काढली जाते. सदर मिरवणुकीचे पुढील बाजूस देखावे/ चित्र रथ-15, घोडे-2, बॅन्जो बॅण्ड-1, असे असून सदर मिरवणुकीमध्ये 10,000 ते 12,000 जनसमुदाय सामील होत असतात. तसेच सदरची मिरवणुक पाहणेसाठी कराड शहरातील व शहरालगतचे गावातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. तरी सदरची मिरवणूक विना अडथळा पार पडणे करिता

दिनांक-20/04/2026 रोजीचे 14.00 वा. ते दिनांक-20/04/2026 रोजीचे रात्रौ.22.00 वा. पर्यंतचे कालावधीत अगर मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गात पुढील प्रमाणे वाहतूकीत बदल करणेत येत आहेत.

शिवजयंती मिरवणुक-2026 चे अनुशंगाने कराड शहर अंतर्गत वाहतुक मार्गात केलेले बदल खालील प्रमाणे :-

1. कृष्णा सर्कल ते पांढरीचा मारुती मंदीर-जोतिबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-दर्गा मोहल्ला-चावडी चौक-नेहरू चौक-आझाद चौक-यशवंत हायस्कूल-दत्त चौक या मार्गावर सर्व दुचाकी व चार चाकी वाहने यांना रस्त्यावर पार्किंग करण्यास अगर वाहने लावण्यास मनाई करणेत येत आहे.

2. दत्त चौक-यशवंत हायस्कूल-आझाद चौक-चावडी चौक-प्रिती संगम घाट-जोतिबा मंदिरमार्गे जाणा-या वाहनांना सदर मार्गावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे , सदरची वाहने ही आझाद चौक-सात शहीद चौक-जनकल्याण बँक मार्गे जातील  

3. चावडी चौक-कमानी मारुती मंदीर-जोतिबा मंदीर-कृष्णा सर्कल या मार्गात मिरवणूक चावडी चौकापासून पुढे पास होईपर्यंत प्रवेश बंदी करणेत येत आहे.

4. सैदापूर कॅनॉल- विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड-दत्त चौक- कोल्हापूर नाका जाणारे वाहनांना सैदापूर कॅनॉल-विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड टि पॉईंट-भेदा चौक-पोपट भाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापूर नाका असे वाहतूक मार्गात बदल करणेत येत आहे.

5. शाहू चौक दत्त चौक ते यशवंत हायस्कूल-आझाद चौक-नेहरू चौक-चावडी चौक जाणारे वाहनांना मिरवणूकीचे वेळी प्रवेश बंद करणेत येत असून सदर वाहने ही शाहू चौक-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-एस.टी. स्टॅण्ड टी पॉईंट-विजय दिवस चौक – सैदापूर कॅनॉल यामार्गे जातील.

6. पाटण तिकाटणे – दैत्य निवारणी-शाहू चौक-दत्त चौक-आझाद चौक-चावडी चौककडे जाणा-या वाहनांना दत्त चौकापासून चावडी चौक-नागोबा मंदिर मार्गे पुढे प्रवेश बंदी करणेत येत असून सदर वाहने ही अजंठा चौक- पोपट भाई पेट्रोल पंप-भेदा चौक-विजय दिवस चौक मार्गे पुढे जातील.

7. सैदापूर कॅनॉल-कृष्णा सर्कल-नागोबा मंदिर-जोतिबा मंदिर-कमानी मारूती मंदिर-चावडी चौक-आझाद चौक-दत्त चौक जाणा-या वाहनांना मिरवणूक चालू होवून पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

वरील सर्व मार्गावरून रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने, पोलीस दलाची वाहने, स्कूल बस अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणेत येत आहे

वरील वाहतूकीतील बदल हे दिनांक 20/04/2026 रोजी 14.00 ते 22.00 वाजेपर्यंत किंवा मिरवणूक संपे पर्यंतच्या वेळेत करणेत येत आहे.

तरी या बदलाची नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!