E-Paper

नवीन व दुबार शिधापत्रिकांच्या मंजूर प्रक्रिया 

 पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सहीला नायकवडे यांच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचा ठपका  

कराड तहसील कार्यालय पुरवठा विभाग  

नवीन व दुबार शिधापत्रिकांच्या मंजूर प्रक्रिया 

 पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सहीला नायकवडे यांच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचा ठपका  

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की  सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिनांक 26 6 /2026 रोजी कराड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना व माहिती देताना गणेश पवार म्हणाले की  2162 नवीन व दुबार शिधापत्रिकांच्या मंजूर प्रक्रियेची सखोल चौकशी करावी तसेच श्रीमती सहीला नायकवडे यांची खातेनिहाय चौकशी करावी 

प्रत्येक प्रकरणामध्ये सादर करण्यात आलेले आधार कार्ड, रहिवासी पुरावा, ओळखपत्र, उत्पन्नासंबंधी कागदपत्रे, कुटुंब विभक्तीचे पुरावे व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात यावी

संबंधित लाभार्थी शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांमध्ये बसतात किंवा नाहीत तसेच अपात्र व्यक्तींना शिधापत्रिका मंजूर करण्यात आल्या आहेत का, याची चौकशी करण्यात यावी

एकाच व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या नावावर दुबार अथवा एकापेक्षा अधिक शिधापत्रिका मंजूर झाल्या आहेत का, याची AEPDS प्रणाली व इतर अधिकृत अभिलेखांच्या आधारे सखोल तपासणी करण्यात यावी

 मंजूर करण्यात आलेल्या शिधापत्रिकांपैकी किती शिधापत्रिका नवीन आहेत व किती दुबार (Duplicate) स्वरूपाच्या आहेत, याची वर्गवारी करून तपासणी करण्यात यावी

शिधापत्रिका मंजुरी प्रक्रियेमध्ये नियमभंग, निष्काळजीपणा, अनियमितता, चुकीची माहिती स्वीकारणे अथवा संगनमत झाले आहे का, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी

मंजूर करण्यात आलेल्या शिधापत्रिकांच्या अर्जामध्ये खोटी, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती सादर करण्यात आली होती का, याची तपासणी करण्यात यावी

मंजुरी प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष पडताळणी (Field Verification) करण्यात आली होती का तसेच त्याबाबतचे अहवाल व अभिलेख उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्यात यावी

मंजूर करण्यात आलेल्या शिधापत्रिकांच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत धान्य लाभ देण्यात आला असल्यास त्याचा तपशील तपासण्यात यावा

AEPDS प्रणालीतील नोंदी, अर्ज, मंजुरी आदेश, तपासणी अहवाल, संगणकीय माहिती व कार्यालयीन अभिलेख यांची परस्पर पडताळणी करून वस्तुस्थिती निश्चित करण्यात यावी

 चौकशीदरम्यान संबंधित सर्व अभिलेख, अर्ज, मंजुरी आदेश, तपासणी अहवाल व संगणकीय नोंदी अर्जदारासमक्ष तपासण्यात याव्यात तसेच अर्जदारास पुरावे, कागदपत्रे व म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात यावी

चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तपासणी अहवाल, निष्कर्ष व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदारास उपलब्ध करून देण्यात यावी

चौकशीत कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा इतर व्यक्तीची जबाबदारी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध लागू कायदे, शासन नियम व महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी

 पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला नायकवडे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शिधापत्रिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता अथवा नियमभंग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी (Departmental Inquiry) सुरु करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

चौकशीमध्ये शासनाची फसवणूक, खोटी कागदपत्रे, संगनमत, अधिकारांचा गैरवापर अथवा शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दोषी व्यक्तींविरु‌द्ध लागू काय‌द्यांनुसार फौजदारी व इतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक, उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी या चौकशीमध्ये संबंधित अधिकारी श्रीमती साहिला नाईकवडे या दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशा आशयाची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून याबाबतची माहिती देण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिनांक 26 6 /2026 रोजी कराड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना व माहिती देताना गणेश पवार म्हणाले की 

सदर तक्रारीवर योग्य व प्रभावी कार्यवाही करण्यात आली नाही तर दिनांक 30 जून 2026 पासून प्रथम काही दिवस धरणे आंदोलन, त्यानंतर काही दिवस ठिय्या आंदोलन व त्यानंतरही योग्य कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे  

सदर आंदोलन लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण पद्धतीने करण्यात येणार असून तक्रारीवर वेळेत कार्यवाही न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील

सदरच्या संपूर्ण प्रकाराबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर व याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरील अधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडे कराड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे 

व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिलेली सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!