चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, शाखा कराड. व एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य सिनेमा. सुमी
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, शाखा कराड. व एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य सिनेमा. सुमी
‘सुमी’ (सुमती) ही ग्रामीण भागातील एक १२ वर्षांची एका गरीब कुटुंबातील मुलगी. तिचे वडील दगडखाणीत काम करतात आणि आई शिलाई काम करते. सुमीला शिकून डॉक्टर व्हायचे आहे, परंतु तिची शाळा घरापासून खूप दूर आहे. तिथे जाण्यासाठी तिला सायकलची गरज आहे, जी विकत घेण्याची तिची आर्थिक परिस्थिती नाही, तसेच सायकल चालवायला कोण शिकवणार हा ही प्रश्न. सुमी सायकलसाठी पैसे वाचवते, परंतु दुर्दैवाने ते पैसे चोरीला जातात. त्यातच तिच्या वडिलांची नोकरी जाते, कुटुंबावर आर्थिक संकट येते.
पुढे सुमी आणि तिचे कुटुंब पुन्हा उभे राहतात का?तिच्या या संघर्षाला आणि प्रबळ इच्छा शक्ती यश येत का? सुमीचे ते स्वप्न पूर्ण होतं का ? तिला सायकल मिळते का? आणि तिला सायकल चालवायला कोण शिकवत? ती शाळेत जाते का ?
हे पाहण्यासाठी आपल्या घरातील, शेजारील बालमित्रांना घेऊन नक्की या.
चित्रपट : सुमी (मराठी)
दिनांक: रविवार 28 जून 2026, वेळ : सकाळी 9.15 वाजता
स्थळ : शताब्दी हॉल, कराड अर्बन बँक, हेड ऑफिस, शनिवार पेठ, कराड.




