E-Paper

१५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या विहीरीचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

महारुगडेवाडीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

 

१५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या विहीरीचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

महारुगडेवाडीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

कराड, प्रतिनिधी : –  याबाबत अधिक माहिती अशी की महारुगडेवाडी (ता. कराड) येथील जनतेची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी, या गावात विहीर खुदाईसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. अवघ्या एका महिन्यात उभारण्यात आलेल्या या विहीरीचे लोकार्पण आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ.डॉ. भोसले म्हणाले, की महारुगडेवाडीने माझ्याकडे विहीरीची मागणी केली होती. या विहीरीच्या कामासाठी मी तात्काळ निधी मंजूर करून दिला व आज या विहीरीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. गावकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी माझा हातभार लागला, याचा मला आनंद आहे. भविष्यात गावाला २४ बाय ७ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

तसेच या विहीरी शेजारील साकव पूल जुना झालेला आहे. याठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावा. मी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. तसेच विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा देखील प्रस्ताव द्यावा.                                           

यावेळी उपस्थित य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कुस्ती संघटक तानाजी चौरे, भाजपा अल्पसंख्यांक सातारा जिल्हाध्यक्ष वसीम मुल्ला, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंकज पाटील, सवादे गावचे सरपंच संजय शेवाळे, निळकंठ शेडगे, मंडल अध्यक्ष प्रविण साळुंखे, सचिन बागट, जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, मनवचे उपसरपंच दादा शेवाळे, महारुगडेवाडीचे सरपंच बाळकृष्ण माने, उपसरपंच अजित महारुगडे, टाळगाव सेवा सोसायटी संचालक सागर जाधव, येळगाव विविध विकास सेवा सोसायटी चेअरमन बाजीराव शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महारुगडेवाडी : स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या विहिरीचे लोकार्पण करताना आ.डॉ. अतुलबाबा भोसले.  👇👇👇

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!