
बसपा चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
कराड प्रतिनिधी — बहुजन समाज पार्टी चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
श्री.किरण थोरवडे हे बाल पँथर पासून ते रिपब्लिकन पक्षाचे कराड शहर सरचिटणीस ते बहुजन समाज पार्टी चे महासचिव व शहर अध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी शोषित वंचित पिडीत समाजातील लोकांना न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केलेला आहे. निस्वार्थी पणाणे काम करत असताना सुद्धा त्यांनी हे काम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी साधेपणाने घरगुती कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. त्या वेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती जगुबाई थोरवडे यांनी व त्यांच्या सौभाग्यवती सौ.पूनम थोरवडे औक्षण करून केले.
यावेळी त्यांचे धाकटे बंधू भिमराव थोरवडे,सिमा थोरवडे, शोभा थोरवडे, कविता थोरवडे,भूमी थोरवडे व त्यांचे चिरंजीव युवा कार्यकर्ते प्रवर्तन थोरवडे, महोत्सवी थोरवडे, रुद्र थोरवडे या सह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




