E-Paper

जयंती नाचून नको वाचून हवी !

रामभाऊ सातपुते

जयंती नाचून नको वाचून हवी!

रामभाऊ सातपुते

कराड (प्रतिनिधि) दि.२ एप्रिल २०२६ :- याबाबत अधिक माहिती अशी की  महात्म्यांची जयंती नाचून नाही तर त्यांच्या विचार वाचून साजरी करण्यात यावी असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सातपुते यांनी कार्वे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरूण मंडळ आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रमात व्यक्त केले कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमास राजेंद्र कुरणे,शैलेश भिंगारदेवे,तानाजी वायदंडे,सर्जेराव वायदंडे,राहुल वायदंडे, उमाजी वायदंडे,निलेश वायदंडे, विजयराव वायदंडे,राजेंद्र माने,प्रशांत साठे,सुरज वायदंडे,शंकर अवघडे,संदिप वायदंडे यांचेसह महिला भगिनींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

सातपुते पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,अण्णाभाऊ साठे,क्रांतिगुरू लहुजी साळवे यांसारख्या समाजसुधारकांनी तत्कालीन चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था बदलण्यासाठी आपली आयुष्य कष्टमयरित्या समर्पित केली.बाबासाहेबांनी जगातल्या अनेक देशांच्या व्यवस्थांचा अभ्यास करून आपल्या भारत देशाला परिपूर्ण असे प्रत्येक समाज घटकाला न्याय देणारे संविधान दिले.प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क दिला. 

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून लढणारी माणसं ,त्यांच कष्ट,देशाभिमान,त्यांच चारित्र्य आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी जीवंत माणसं उभी केली.तर फुले दांम्पत्यान प्रचंड प्रमाणात विरोध सहन करीत  स्त्री शिक्षणाचे काम केले.या सर्व महात्म्यांच्या कार्याचा उद्देश  फक्त समाजसुधारणा होता.या सुधारणावादी विचारांची कास धरून नवा समाज घडविण्याचे काम करूया! असे आवाहन रामभाऊ सातपुते यांनी केले.

दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी ,भारत देशाची जातनिहाय जनगणना दि.१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेली आहे,प्रगणनाकारांना माहीती देताना कुटुंबातील व्यक्तींनी आपला धर्म आणि जात स्पष्टपणे सांगितले पाहिजे त्यावरूनच आपापल्या जातीची लोकसंख्या निश्चित होणार आहे.अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अबकड संदर्भात चालू असलेल्या लढ्यास समाज जागृती सह पाठबळ देणं आपल कर्तव्य मानून आंदोलनात सहभागी व्हाव..असे आवाहन केले.

प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अभिजीत वायदंडे यांनी केले ,स्वागत विजय वायदंडे यांनी केले तर आभार जयवंत सकटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!