आरोप प्रत्यारोपच्या नादात कराडच्या विकासाला खीळ बसणार..
आरोप प्रत्यारोप मुळे यशवंत विचारांची पायमल्ली..

आरोप प्रत्यारोपच्या नादात कराडच्या विकासाला खीळ बसणार..
आरोप प्रत्यारोप मुळे यशवंत विचारांची पायमल्ली..
कराड प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन ज्यांनी चाळीस वर्षे कराड नगरीचे नगराध्यक्ष पद भूषविले ते आदरणीय पी.डी.पाटील साहेब..स्व. पी. डी. पाटील (पांडुरंग दादासाहेब पाटील) हे कराड नगरपालिकेचे सर्वात प्रदीर्घ काळ (४३ वर्षे) राहिलेले माजी नगराध्यक्ष आणि कराड नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी २० डिसेंबर १९५३ ते १६ डिसेंबर १९९६ या प्रदीर्घ कालावधीत कराडचे नगराध्यक्षपद भूषवले, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. पी डी पाटील साहेबांच्या कारकिर्दीत भुयारी गटार योजना असेल पाणी पुरवठा योजना असेल अशा अनेक योजनांची अंमलबजावणी यशस्वी पणे झाली
त्यांच्या वेळी सुद्धा विरोधी नगरसेवक असायचे त्यामध्ये प्रामुख्याने युनुस कच्छी, डॉ. दत्तात्रय एरम, राजाभाऊ देशपांडे सारखे अनुभवी विरोधी नगरसेवक कराड शहराच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा करायचे आणि सर्व विषय हे एकमताने मंजूर व्हायचे.
परंतु गेल्या सहा सात महिन्यात कराड शहराच्या विकासासाठी जे राजकारण चालू आहे ते बघता सर्वसामान्य नागरिकांना स्व.पी.डी.पाटील साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
सध्याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे पूर्वी कोणत्या आघाडीचे नगरसेवक होते याचा हि विचार येथील सुज्ञ नागरिक व मतदार करताना दिसत आहेत.
सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार व महाराष्ट्रात महायुती चे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक आघाड्या आणि राजकीय पक्षातील नगरसेवक यांच्यात निधी खर्चावरुन सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणे पक्ष निष्ठा दाखवणे या सारख्या विषयावर शहराचं लक्ष विचलित करत राहणे हा एकमेव अजेंडा असल्यासारखे सध्या तरी दिसत आहे.
आयाराम गयाराम सारखी परिस्थिती असताना आम्ही किती कडवट पक्षाचे कार्यकर्ते आहोत याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे आणि आम्ही इथल्या सत्ताधारी पक्षाला कसा जाब विचारतोय अशी जी चर्चा आहे ती चर्चा न होता सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आदरणीय पी.डी.पाटील साहेब यांच्या विचारांचा व त्यांनी कराड शहराचा विकास कसा केला याचे आत्मचिंतन करुन येणाऱ्या भविष्यकाळात सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी काम करावे अशी भावना शहरातील नागरिकांकडून होत आहे..




