
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथकाकडून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई
कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मा.श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक, साो सातारा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये अवैध वेश्या व्यवसायांवर परिणामकारक कारवायांची मोहिम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे.
आज रोजी मा. श्रीमती, राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांना मौजे तळबीड पोलीस ठाणे हददीतील मौजे विरवडे गावचे हददीतील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने श्रीमती. राजश्री पाटील यांनी तळबीड पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी स.पो.नि. श्री रविंद्र भोरे, श्रीमती शितल पाटील म.पो.उ.नि..पो.उ.नि. काळे, पोलीस अंमलदार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख, हर्षल साळुंखे, धनंजय कोळी पुष्पा चव्हाण सचिन गुरव, कुलदिप कोळी, गणेश बाकले, अभय मोरे, तेजस्वीनी मोहिते यांना सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेशित केले.
त्याप्रमाणे सदर पथकाने हॉटेल शुक्रतारा तळबीड येथे डमी ग्राहक पाठवुन खातरजमा करुन, पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता, तेथे हॉटेल शुक्रताराचा मॅनेजर सुरज मारुती सावंत वय -27,रा. भिकवडी, ता. कडेगाव जि. सांगली दोन पिडीत महिला यांचे करवी अवैध वेश्या व्यवसाय चालवित असताना मिळुन आले. सदर कारवाईमध्ये मिळुन आलेल्या दोन परराज्यातील पिडीत महिलांची सुटका करुन, तळबीड पोलीस ठाणेत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे करत आहेत.
अवैध वेश्या व्यवसाय चालविणारे गुन्हेगारी प्रवृत्तींचे इसमांविरुध्द यापुढे देखील कायदेशीर कारवाया सुरु राहणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक साो निखिल पिंगळे मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्पष्ट केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्रीमती राजश्री पाटील यांचे व कारवाई पथकातील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.




