लोकप्रिय आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयास सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छता किट ची मदत
लोकप्रिय आमदार अतुलबाबा भोसले

लोकप्रिय आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयास सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छता किट ची मदत !
कराड प्रतिनिधी :- कराड दक्षिण विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास सामाजिक कार्यकर्ते गणेश प्रल्हाद पवार, दीपक विभुते आणि मित्र परिवार यांच्या वतीने रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य गणेश पवार मित्र परिवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिले
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व गणेश पवार म्हणाले की रुग्णांना फळे व इतर वस्तू देण्यापेक्षा रुग्णालयामध्ये स्वच्छते साठी लागणारे साहित्य दिले तर रुग्णालयाची स्वच्छता अधिक प्रभावीपणे होईल व रुग्ण हा निरामय वातावरणात चांगला बरा होऊन घरी जाऊ शकेल , या सामाजिक भावनेतून आम्ही हा उपक्रम राबविला आहे , त्याच बरोबर कराड दक्षिण विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना चांगले आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो व अशी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या , यावेळी त्यांच्या समवेत गणेश पवार मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते !



