E-Paper

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सतर्कतेपणामुळे व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रशांत देसाई यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने महिलेला जीवदान !

कराडच्या जुन्या कोयना पुलावरून पाण्यात उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सतर्कतेपणामुळे व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रशांत देसाई यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने महिलेला जीवदान !

कराडच्या जुन्या कोयना पुलावरून पाण्यात उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवार दिनांक १९ रोजी दुपारच्या तीन सव्वा तीनच्या दरम्यान एका विवाहित महिलेने कराड येथील ब्रिटिश कालीन जुना कोयना पुलावरून पाण्यात उडी घेऊन आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतलेल्या महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारली , याची माहिती मिळताच कोणत्याही प्रकारचा विलंब न करता कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व टीम अनिल स्वामी सतीश पाटील व इतर सहकाऱ्यांनी ब्रिटिश कालीन जुन्या कोयना पुलावर धाव घेतली क्षणार्धात पुलावर बघ्यांची मोठी गर्दी वाढू लागली पाण्याच्या प्रवाहात ती महिला गटांगळ्या खात होती त्या ठिकाणी पाण्यात मासे मारी करत असलेल्यांच्या मदतीने तिला पाण्याच्या बाहेर काढून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले यावेळी ती महिला बोलण्याच्याही परिस्थितीत नसताना व पोटात पाणी गेल्याने ती बेशुद्ध अवस्थेत होती , कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत देसाई यांनी शर्थीचे प्रयत्न करुन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला , त्यांच्या सोबत डॉ. सारा मॅडम व इतर कर्मचारी यांनी तिचे प्राण वाचवले , याबद्दल रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे व डॉ. प्रशांत देसाई व त्यांच्या सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले डॉक्टरांमुळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व टीम मुळे या महिलेला जीवदान मिळाल्याची भावना सुद्धा रुग्णालयाच्या आवारात ऐकावयास मिळत होती !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!