वाळवा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील सामुदायिक अत्याचार प्रकरणी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेचे लक्षवेधी धरणे आंदोलन — आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
वाळवा

वाळवा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील सामुदायिक अत्याचार प्रकरणी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेचे लक्षवेधी धरणे आंदोलन — आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, वाळवा तालुका जिल्हा सांगली येथील आष्टा परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर शिक्षकासह प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी यांचे समर्थक यांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेची संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. श्रद्धा शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी राज्य महिला आयोग यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन यांना निवेदन देऊन या अत्याचाराविरोधात व आवाज उठविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन सुद्धा त्यांना पाठीशी घातले जात असल्याच्या निषेधार्थ व त्या मुलीचा ज्या डॉक्टरने तिचा गर्भपात केला आहे त्याची चौकशी करून त्याला अटक करावी या मागणीसाठी आज संघटनेच्या वतीने वाळवा तालुका तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सह महिला व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.





