उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.गजानन सुपेकर यांचा सेवा निवृत्त निरोप समारंभ संपन्न
कराड

उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.गजानन सुपेकर यांचा सेवा निवृत्त निरोप समारंभ संपन्न
कराड प्रतिनिधी — स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.गजानन सुपेकर यांच्या ३२ वर्षाच्या यशस्वी सेवेबद्दल व सेवा निवृत्त निमित्त कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा पती पत्नी सह व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सर्वाचा यथोचित सत्कार समारंभ व पुढील वाटचालीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ सुनिला लाळे यांनी सर्व कर्मचारी यांचे वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
या वेळी बोलताना डॉ सौ सुनिला लाळे म्हणाल्या की, श्री सुपेकर हे सार्वजनिक आरोग्य विभागात गेली ३२ वर्ष विविध ठिकाणी प्रशासकीय कामकाज पाहत होते. परंतु त्यांचा सेवा निवृत्त निरोप समारंभ हा महाराष्ट्राचे सुपुत्र स्व.यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नी स्व. वेणूताई चव्हाण यांच्या नावाने कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासन सेवेतील अधिकारी यांना सेवेतून निरोप देत असताना मन गहिवरून येते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या वेळी सहाय्यक अधीक्षक श्री. आदेश कांबळे, सहाय्यक परिसेविका सुवर्णा जेटीथोर, रेखा यादव, कार्यालयीन कर्मचारी श्री.कोंडीबा कोळेकर, निलेश माने, गणेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत देसाई, डॉ. पाटील, व रुग्णालयातील सर्व अधिपरीचारिका डॉक्टर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या वेळी विविध मान्यवरांनी श्री. सुपेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान बहुजन समाज पार्टी चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांनी श्री.सुपेकर यांचा शाल श्रीफळ देवून व उपजिल्हा रुग्णालयाची प्रतिकूती प्रतिमा भेट देऊन उपजिल्हा रुग्णालय हे सतत स्मरणात राहील या भावनेतून त्यांनी ही प्रतिमा भेट दिल्याची भावना या वेळी बोलून दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महेश शिंदे यांनी केले तर शेवटी सहाय्यक अधीक्षक श्री. आदेश कांबळे यांनी आभार मानले.






