E-Paper

बसपाचं धाडसी नेतृत्व सतीश रणशिंगारे… आंबेडकरी चळवळीतला बुलंद आवाज..

वाढदिवस विशेष लेख

बसपाचं धाडसी नेतृत्व सतीश रणशिंगारे… आंबेडकरी चळवळीतला बुलंद आवाज..

शिव, फुले, शाहू, आंबेडकर मान्य.कांशीरामजी यांच्या विचारांचा प्रभाव अंगिकारुन त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मान्यवर कांशीरामजी व बहृन कु.मायावतीजी यांना प्रमाण मानून कराड शहरात बहुजन समाज पार्टीत तन मन धनाने कामाला सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात त्याचं गाव पण १९७२ साली पडलेल्या दुष्काळामुळे त्यांच्या आई वडिलांनी गाव सोडून ते कराड शहरातील नदी काठी असलेल्या शिखरे वस्तीत आपले बस्तान मांडले. आई वडील मोलमजुरी करायचे आणि आपली उपजीविका सांभाळत त्यांनी तीन मुलं आणि एक मुलगी जन्माला घातली. सतीश हा सर्वात मोठा बालवाडी पासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण सुध्दा कराडमध्येच घेतले वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापासून तो सुद्धा मिळेल ती कामं करु लागला. जस जसं वय वाढत गेलं तस तसं त्याला आंबेडकरी चळवळीविषयी आस्था निर्माण होत गेली. आणि त्याने बहुजन समाज पार्टीत काम करण्यास सुरुवात केली. बुथ पासून ते कराड उत्तर विधानसभा अध्यक्ष, महासचिव,कराड पाटण प्रभारी म्हणून केलेलं काम याची पोचपावती म्हणून पक्षाने कराड दक्षिण विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाने तिकीट दिले व त्याने ती निवडणूक लढविली. सतीश याने पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उत्तर प्रदेश, लखनौ, कर्नाटक बंगलोर, महाराष्ट्र नागपूर मुंबई येथील कार्यक्रमांना उपस्थित राहुन पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणे.पक्ष शिस्त आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून किती तरी कार्यकर्त्यांना केडर बेस कार्यकर्ता करण्याच काम केले. त्याच्या कामाची पक्ष नेतूत्वाने दखल घेऊन त्याला बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव व जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही बढती देण्यात आली. मागील काही महिन्यात त्याची बहुजन समाज पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदासाठी त्याचे नाव चर्चेत होते. पण काही कारणास्तव त्याने ते पद स्वीकारण्यास नकार दिला. सामाजिक आंदोलन असो की, अन्याय अत्याचार असो प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम त्याच्या खमक्या आवाजात आहे. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणे असो किंवा इतर काही सामाजिक काम असो या कामात अग्रेसर असणारा माझा सहकारी मित्र आणि बहुजन समाज पार्टीचा माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना अत्यंत आनंद होतो की,असा मनमिळाऊ निस्वार्थी आणि प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 

आपला हितचिंतक 

किरण थोरवडे 

माजी शहराध्यक्ष 

बहुजन समाज पार्टी, कराड शहर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!