E-Paper

कराड नगरपरिषद शाळा नंबर १० नव्याने सुरू करण्यासाठी नगरसेवकांनीं नागरिकांना सोबत घेत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

कराड

कराड नगरपरिषद शाळा नंबर १० नव्याने सुरू करण्यासाठी नगरसेवकांनीं नागरिकांना सोबत घेत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन  

कराड प्रतिनिधी — या बाबत  अधिक माहिती अशी की, कराड शहरातील बुधवार पेठ येथे कराड नगरपरिषद शाळा नंबर १० हि अत्यंत नावाजलेली शाळा पट संख्या अभावी बंद अवस्थेत असून ती नव्याने चालू करण्यासाठी बुधवार पेठेतील नागरिकांनी अनेकदा बैठका घेऊन शाळा चालू करण्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्यात आली. त्या अनुषंगाने बुधवार पेठेतील नागरिक व विद्यमान नगरसेवक यांच्या वतीने कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. प्रशांत व्हटकर यांना याबाबत चे निवेदन देण्यात आले. यापूर्वी सुद्धा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.

यावेळी भाजपच्या नगरसेविका वैष्णवी वायदंडे, लोकशाही आघाडीचे नगरसेवक राहुल भोसले, गणेश पवार, अजय पावसकर, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, सामाजिक कार्यकर्ते निशांत ढेकळे, किशोर आठवले, सुनील थोरवडे, प्रभाकर थोरवडे, राजकुमार लादे सर, प्रवीण लादे सर, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!