E-Paper

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

रुग्णालय प्रशासन फोडतय रुग्णांच्या नातेवाईकांवर खापर

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

रुग्णालय प्रशासन फोडतय रुग्णांच्या नातेवाईकांवर खापर

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचे असून या रुग्णालयात कराड, पाटण, कडेगांव, शिराळा व इतर तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णालयात अंतररुग्ण विभाग असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसूती चे रुग्ण ॲडमिट असतात. त्या बरोबर सर्व सामान्य रुग्ण सुद्धा ॲडमिट असतात. परंतु या ठिकाणी स्वच्छता व सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात पण पिण्याच्या पाण्याची समस्या आजपर्यंत सुटू शकलेली नाही. पाण्याचा अपुरा पुरवठा असल्याचे रुग्णालय प्रशासनाला माहिती असून सुद्धा रुग्णालय प्रशासन हे आपली जबाबदारी झटकून रुग्णांच्या नातेवाईकांवर पाण्याचे नळ चालू ठेवतात त्यांच्यामुळे पाण्याची गळती होऊन रुग्णांना पिण्याचे पाणी मिळत नाही असे खापर फोडून मोकळे होतात. उपजिल्हा रुग्णालयाच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी रुग्णालय प्रशासन तातडीने उपाययोजना करणार आहे की नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. पाण्याचा अपुरा पुरवठा का होत आहे याकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देणार आहे की नाही यावर शहरातील विविध सामाजिक संस्था व पक्षाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. अन्यथा उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रुग्णालय प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!