
बुध्द जयंती निमित्त तालुकास्तरीय धम्म परिषदेचे आयोजन
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, १ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बौध्दजन हितवर्धक संघ, मुंबई संचलित येवती तालुका कराड यांच्या वतीने कराड येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांची सहविचार बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.दिलीप लोखंडे सर होते.
यावेळी बुध्दजन हितवर्धक संघाच्या वतीने कार्यक्रमाची रुपरेषा व प्रास्ताविक करण्यात आले. या प्रास्ताविकामधे येणाऱ्या बुध्द जयंतीच्या निमित्ताने दहा दिवस कार्यक्रम कशा पद्धतीने साजरे करता येतील यावर विचार विनिमय करण्यात आला. या वर्षी पासून तालुका स्तरावर बौद्ध पोणिमा म्हणजेच बुध्द जयंती साजरी करण्याबरोबरच धम्म परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विभागवार विविध समित्या स्थापन करून धम्म परिषद मोठ्या प्रमाणावर करण्याचे बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी या चर्चेत विविध मान्यवरांनी आपल्या सुचना मांडल्या व त्या सुचनेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे बैठकीचे अध्यक्ष प्रा. दिलीप लोखंडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या चर्चेत विद्याधर गायकवाड, किरण थोरवडे, राजकुमार लादे सर, पिराजी थोरवडे, आप्पासाहेब गायकवाड, आनंदराव लादे, ॲड. लाड, अशोक भोसले, दिपक धुमाळ, कमल सावंत, महेंद्र वाघमारे, संतोष थोरवडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी बुध्दजन हितवर्दक संघाच्या वतीने आभार मानले.




