माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन
कराड येथे जाहीर व्याख्यान

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त कराड येथील मातोश्री रमाबाई विहार बुधवार पेठ कराड येथे शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा लादे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वेणूताई चव्हाण कालेजचे माजी प्राचार्य बी.एन.कालेकर असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे तर प्रमुख उपस्थिती कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री.राजेंद्रसिंह यादव व कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, आनंदराव लादे, सुरेश लादे, प्रवीण लादे, विजय लादे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या जाहिर व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रमाई महिला मंडळाच्या सचिव सारिका लादे यांनी केले.




