E-Paper

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : निवडणूक निरीक्षक सुषमा सातपुते यांची कराड येथे पाहणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : निवडणूक निरीक्षक सुषमा सातपुते यांची कराड येथे पाहणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त, निष्पक्ष व कायदेशीर वातावरणात पार पडावी, या उद्देशाने आज निवडणूक निरीक्षक (ऑब्झर्वर) सुषमा सातपुते यांनी कराड येथील धान्य गोदाम परिसरात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन सखोल पाहणी केली.

यावेळी त्यांनी निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना, स्ट्राँग रूमची सुरक्षितता तसेच मतमोजणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याची खातरजमा त्यांनी केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व व्यवस्थापन विभाग प्रमुख अक्षय सपाटे यांनी निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये मतदानासाठी रवाना झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या, मतदानाच्या दिवशीची संपूर्ण व्यवस्था व तयारी, केंद्राध्यक्ष व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आवश्यक सूचना यांचा समावेश होता.

तसेच मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती देताना २४ टेबलवर ईव्हीएमद्वारे मतमोजणीसाठी पूर्ण तयारी केली असून, १२ टेबलवर टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचीही माहिती देण्यात आली.

संपूर्ण व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करत निवडणूक निरीक्षक सुषमा सातपुते यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

या पाहणीवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब तहसीलदार महेश उबारे, विश्वजीतसिंह राजपूत, बाबुराव राठोड, सहाय्यक अभियंता श्वेता राजेंद्र जाधव, सुरज शिंदे व श्रेयस पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!