श्री प्रमोद श्रीकृष्ण पाटील ( दक्ष कराडकर ) यांच्यावतीने निकृष्ट काँक्रिटीकरणाबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
दक्ष कराडकर

श्री प्रमोद श्रीकृष्ण पाटील ( दक्ष कराडकर ) यांच्यावतीने निकृष्ट काँक्रिटीकरणाबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की कराड शहरातील मंगळवार पेठ, कन्या शाळा, जोतिबा मंदिर मुख्य मार्गावर पाटील हाईट बिल्डिंग ते कराड नगरपरिषदे कडे जाणाऱ्या चौकात मध्यंतरी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. सदर कामानंतर करण्यात आलेले खोदकाम निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटने बुजविण्यात आले असल्यामुळे त्या काँक्रीटची खडी सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.
या परिस्थितीमुळे वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सायकली सदर खडीमुळे घसरत असून काही नागरिकांना किरकोळ इजाही झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तरी सदर ठिकाणी तातडीने लक्ष देऊन निकृष्ट काँक्रीट काढून त्या जागी चांगल्या प्रतीचे व दर्जेदार काँक्रीट टाकण्यात यावे, तसेच रस्ता पूर्ववत सुरक्षित करण्यात यावा, ही नम्र विनंती आहे. नागरिकांची गैरसोय व संभाव्य अपघात टाळण्यासाठी योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.
आपली सकारात्मक व तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे.
आता या निवेदनावरती मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर कराड नगरपरिषद कराड काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधून लागले आहे





