डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी….
मिरवणूक मार्गावर दुतर्फा रस्त्यावर तोबा गर्दी पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक !

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी….
मिरवणूक मार्गावर दुतर्फा रस्त्यावर तोबा गर्दी पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक !
कराड प्रतिनिधी : – याबाबत अधिक माहिती अशी की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज निघालेल्या मिरवणुकीत अबाल वध्दासह महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मानाच्या घोड्याच्या लिलाव होऊन मिरवणुकीला सुरुवात होती , लिलावाची पहिली बोली कु.महोत्सवी किरण थोरवडे केली.
त्यानंतर या बोलीला रंगत येऊन ती बोली शैला विजय कांबळे यांनी ही बोली जिंकली व मानाच्या घोड्याचा मान मिळवला ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शैला विजय कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली ,
मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी वाटप, सरबत लस्सी चेही वाटप सामाजिक संघटनांनी केले , मिरवणुकीमध्ये मानाच्या घोड्यावर स्थानापन्न झालेल्या मानकरी सह बँड, बेंजो, धनगरी ढोल या सह विविध चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते ,
यामध्ये मंगळवार पेठेतील भिमरत्न मंडळाने भगवान गौतम बुद्ध यांची बोधी वूक्षाखाली बसलेल्या गौतम बुद्ध यांचा चित्ररथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती , बौध्द युवा जागूती परिषद बुध्द लेणी संविधान , कराड यांनी चैत्य सूप हा चित्ररथ सहभागी केला होता , या मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता ,
शिस्तबद्ध पद्धतीने व मिरवणूक मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता ,
या मिरवणुकीत उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांनी स्वतः या मिरवणुकीत लक्ष घातले होते , व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केले , कुठेही गालबोट न लागता जयंती उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा झाला ,
शेवटी जयंती उत्सव कमेटीच्या वतीने शरणंतय घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली !




