डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक-14/04/2026 रोजी 14.00 ते रात्री. 22.00 वा. चे दरम्यान कराड शहर अंतर्गत वाहतुक मार्गात बदल
शहरातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक-14/04/2026 रोजी 14.00 ते रात्री. 22.00 वा. चे दरम्यान कराड शहर अंतर्गत वाहतुक मार्गात बदल
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी कराड यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक कराड शहर हद्यीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-बुरूड गल्ली चर्च रोड-राज मेडिकल-एस.टी. स्टॅण्ड-कर्मवीर पुतळा-दत्त चौक-दत्त चौक-परमार लाईट हाऊस-यशवंत हायस्कूल-गणपती मंदिर-आझाद चौक -नेहरू चौक-चावडी चौक-कमानी मारूती मंदिर-कन्या शाळा-ज्योतिबा मंदिर-नागोबा मंदिर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत काढली जाते.
सदर मिरवणुकीचे पुढील बाजूस बग्गी-2, घोडे-5, बॅन्जो बॅण्ड-1, हलगी-1, बेगाळया-8, चित्र रथ-3 असून सदर मिरवणुकीमध्ये 6000 ते 7000 जनसमुदाय सामील होत आहे. तसेच सदरची मिरवणुक पाहणेसाठी कराड शहरातील व शहरालगतचे गावातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.
सदर मिरवणूकीचे मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होवू नये याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीचे मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक-महात्मा फुले चौक-राज मेडीकल दत्त चौक-आझाद चौक-चावडी चौक-जोतिबा मंदिर-नागोबा मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावर सर्व दुचाकी व चार चाकी वाहने यांना रस्त्यावर पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
2. सैदापूर कॅनॉल- विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड-दत्त चौक- कोल्हापूर नाका जाणारे वाहनांना सैदापूर कॅनॉल-विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड टि पॉईंट-भेदा चौक -पोपट भाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापूर नाका असे वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे.
3. महात्मा गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोल पंप शाहु चौक-दत्त चौक- एस.टी. स्टॅण्ड-विजय दिवस चौक-सैदापूर कॅनॉल कडे जाणा-या वाहनांना मिरवणूकीचे वेळी प्रवेश बंद करणे आवश्यक असून सदर वाहने ही कोल्हापूर नाका पोपटभाई पंट्रोलपंप-भेदा चौक- एस.टी. स्टॅण्ड टी पॉईट-विजय दिवस चौक सैदापूर कॅनॉल यामार्गे जातील.
4. पाटण तिकाटणे – दैत्य निवारणी-शाहू चौक-दत्त चौक-आझाद चौक-चावडी चौककडे जाणा-या वाहनांना दत्त चौकापासून चावडी चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे प्रवेश बंदी करणे आवश्यक असून सदर वाहने ही अजंठा चौक-पोपट भाई पेट्रोल पंप-भेदा चौक-विजय दिवस चौक मार्गे जातील.
5. सैदापूर कॅनॉल-कृष्णा सर्कल-नागोबा मंदिर-जोतिबा मंदिर-कमानी मारूती मंदिर-चावडी चौक-आझाद चौक-दत्त चौक जाणा-या वाहनांना मिरवणूक चालू होवून पुर्ण होईपर्यंत प्रवेश बंद राहिल.
6. दत्त चौक-यशवंत हायस्कूल-आझाद चौक-चावडी चौक-प्रिती संगम घाट-जोतिबा मंदिरमार्गे जाणा-या वाहनांना सदर मार्गावर प्रवेश बंदी करणे आवश्यक असून सदरची वाहने ही आझाद चौक-सात शहीद चौक-जनकल्याण बैंक मार्ग जातील.
वरील सर्व मार्गावरून रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने, पोलीस दलाची वाहने, स्कूल बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणेत येत आहे
वरील वाहतूकीतील बदल हे दिनांक 14/04/2026 रोजी 14.00 ते 22.00 वा अगर मिरवणूक विसर्जन संपेपर्यंतच्या वेळेत करणेत येत आहे.
तरी या बदलाची नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.




