E-Paper

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच होणार! नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची माहिती

कराड

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच होणार! नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची माहिती

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा. श्री. तुकाराम मुंढे हे तरुणाईशी संवाद साधण्यासाठी कराडमध्ये येत आहेत. या व्याख्यानाला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अपेक्षित गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने कृष्णाबाई घाटावरील वाळवंटात व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू केले होते.

मात्र, राज्य शासनाने कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे हे व्याख्यान होणार आहे. उपस्थितांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात तसेच टाऊन हॉल परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरात स्क्रीन लावून नागरिकांना व्याख्यानाचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नागरिकांना शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्याचे आवाहन केले आहे. वाहनाने येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, पार्किंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्याख्यानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!