E-Paper

गांजा तस्करांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे 

गांजा तस्करी रोखण्याकरिता ठोस उपाययोजना करने गरजेचे

गांजा तस्करांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे 

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील या सातारा जिल्ह्याचे अँटी नार्कोटिक्स अवरनेस कॅम्पेनचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत नुकतेच दिनांक 12 10 2026 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मार्केट यार्ड परिसरातील रत्नागिरी गोडाऊन च्या पाठीमागे राहत्या घराजवळ अशोक नंदापा बिराजदार राहणार रेटरेकर कॉलनी मुजावर कॉलनी रोड कराड हा गांजा विक्री करण्याकरिता घेऊन आला आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने श्रीमती राजश्री पाटील यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड येथील पथकाने छापा कारवाई करून 96 हजार 100 रुपये किमतीचा 1.922 किलोग्राम वजनाचा गांजा जप्त केला तदनंतर प्रसिद्धी माध्यमांना प्रेस नोट द्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली . त्या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले व नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले 

काही नागरिकांच्या मते गांजा विक्री करणारा इसम नामे अशोक नंदाप्पा बिराजदार हा सर्वपरिचित असून काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखील तो चांगल्या परिचयाचा आहे तो ज्या कोणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिचयाचा आहे त्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही किंवा एखादा अवैध व्यवसायिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा परिचित असणे म्हणजे त्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हा केला असे देखील नाही… अशोक नंदाप्पा बिराजदार यांच्याकडे गांजा सापडला त्याच्यावरती कारवाई केली ही बाब कौतुकास्पद आहे…परंतु शहरातील मुख्य गांजा तस्कर हे अजूनही मोकाटच आहेत..

शहरांमध्ये गांजा तस्करी कोण कोण करते याचा मास्टरमाइंड कोण आहे हे सुज्ञ नागरिकांना माहिती देखील आहे परंतु पोलिसांच्याकडे वर्दी आहे कायदा आहे अधिकार आहेत तसे आम्ही जर आवाज उठवला तर आमच्याकडे असे काहीच नाही त्यामुळे जर यांची नावे बाहेर काढली तर कोणीतरी आपला शत्रू निर्माण होईल व आपणास मारहाण होणे धमकी देणे असा प्रकार घडू शकतो त्यामुळे सुज्ञ नागरिक प्रशासनास याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करतात….

एकीकडे पोलीस प्रशासन गांजा पेडलरांवरती कारवाई करते तर दुसरीकडे मात्र या गांजा पेडलरांचा आका मोकाटच फिरत आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून कारवाया झाल्यानंतर… यांचा दर वाढत आहे, शंभर रुपयाला मिळणारी चिमूटभर पुडी आता चक्क दोनशे रुपयाला मिळू लागली आहे..अशी देखील चर्चा सध्या सुरु आहे 

गांजाच्या व्यसनामुळे तरुणाई भरकट चालली असून गांजाच्या नशेत आपण काय करतो याचे भान तरुणाईला उरलेले नाही त्यामुळे नशेत तल्लीन असणारे तरुण गल्लोगल्ली धतिंगबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देताना दिसून येत आहेत.. नागरिक देखील भीती पोटी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत…

त्यामुळे गांजा तस्करांची साखळी शोधून काढून त्यांच्या आका पर्यंत पोहोचणे व त्याच्या वेळीच मुसक्या आवळून गांजा तस्करांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!