E-Paper

शांताबाई हिंदूराव बनसोडे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन 

निधन वार्ता

शांताबाई हिंदूराव बनसोडे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन 

कराड प्रतिनिधी — गोंदी तालुका कराड येथील प्रगतशील शेतकरी तथा गोंदी ग्रामपंचायत चे माजी सदस्य कालकथित हिंदुराव बनसोडे यांच्या पत्नी शांताबाई हिंदूराव बनसोडे यांचे गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी दुःख निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि तीन मुली असून सुना नातवंडे व मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा हा अंबरनाथ पालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा परिवार वाळवा, शिराळा, कराड तालुक्यासह इतरही जिल्हात त्यांचा मोठा परिवार आहे. शांताबाई हिंदूराव बनसोडे यांना गोंदी गावात शांता काकू म्हणून ग्रामस्थ ओळखत असे. त्यांच्या निधनाने गोंदी गावातील लोकांनी सुध्दा शोक व्यक्त केला आहे. त्यांचा जलदान व रक्षा विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी मौजे गोंदी तालुका कराड येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!