E-Paper

श्री गणेश विसर्जन मिरवणुकी निमित्त कराड शहरातील अंतर्गत वाहतूक मार्गात तात्पुरता बदल 

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था  

श्री गणेश विसर्जन मिरवणुकी निमित्त कराड शहरातील अंतर्गत वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की दिनांक 25 09 2026 वार शुक्रवार रोजी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याकरिता हजारो भाविक कराड शहरामध्ये येत असतात व कृष्णामाई घाट येथे सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते त्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतूक मार्गामध्ये तसेच पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत पाहूया कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून कराड शहरातील श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता व देखावे विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये व वाहतुकीची कोंडी होऊ नये

वाहतुक मार्गात बदल असा असेल 👇👇👇

1) दत्त चौक- यशवंत हायस्कुल- आझाद चौक- नेहरु चौक- चावडी चौक- बालाजी मंदीर-झेंडा चौक-कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणेत येत आहे.

2) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक-आझाद चौक- सात शहीद चौक- शुक्रवार पेठ- बालाजी मंदीर या मार्गे जातील. व शुक्रवार पेठ, बालाजी मंदीर परिसर येथील नागरिक कराड शहरातुन बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतील.

3) कृष्णा नाका, कराड बाजुकडुन सोमवार पेठ, कृष्णा घाट बाजुकडे जाणारी वाहतुक ही कृष्णानाका-जोतीबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-सोमवार पेठ-पाण्याची टाकी- जनकल्याण बँक या रोडने एकेरी वाहतुक मार्गाचा वापर करतील. चावडी चौक ते कृष्णा नाका बाजुकडे येणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे. सोमवार पेठ, कृष्णा घाट बाजुकडुन येणारी वाहतुक नदीपात्रातील रस्त्यावरून राजपुरोहीत बेकरी, जोतीबा मंदीर येथुन कृष्णा नाका मार्गे बाहेर जातील.

4) कृष्णा नाका-जोतीबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-चावडी चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणेत येत आहे.

5) दत्त चौक-यशवंत हायस्कुल- आझाद चौक- नेहरु चौक-चावडी चौक- बालाजी मंदीर मार्गे कृष्णा घाट जाणारे मिरवणुक मार्गात काही अडथळा झालेस सदर मिरवणुकी करीता पर्यायी मार्ग म्हणुन कर्मवीर पुतळा-पोस्ट ऑफीस-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-जोतीबा मंदीर हा ठेवण्यात आला असुन, सदर रस्त्यावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास Sand करणेत येत आहे.

6) पोपटभाई पेट्रोल पंपाकडुन दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आला आहे ,सर्व अवजड वाहने पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक-विजय दिवस चौक- कृष्णा नाका मार्गे विटा बाजुकडे जातील.

7) गणेश विसर्जन मिरवुणकीतील गणेश मुर्ती घेवुन येणारी वाहने गणेश मुर्तीचे नदीपात्रात विसर्जन केले नंतर, नदीपात्रातील वाळवंटात तयार केले रस्त्याने स्मशानभुमी-जोतीबा मंदीर-कृष्णानाका मार्गे बाहेर जातील.

जाणून घेऊयात कोणत्या ठिकाणी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे

गणेश विर्सजन करीता येणारे नागरिकांनी आपली वाहने

शिवाजी उद्यान, कन्या शाळेसमोर असले मोकळे मैदानांवर श्री साईबाबा मंदीर ट्रस्ट, दत्त चौक, कराड येथे असलेले मैदान व जनता पे ऍन्ड पार्क, यशवंत हायस्कुलचे पाठीमागे, कराड येथील मैदान या ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्क करतील.

वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!