E-Paper

कराड वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवून ड्रिंक अँड ड्राईव्ह व बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई

कराड

 

कराड वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवून ड्रिंक अँड ड्राईव्ह व बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई

कराड प्रतिनिधी  :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की कराड शहर व परिसरात वाहतूकिला शिस्त लागावी या उद्देशाने कराड वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक 29/09/2026 रोजी सायंकाळी ड्रिंक अँड ड्राईव्ह विशेष मोहीम राबविण्यात आली

या मोहिमेदरम्यान ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली असता, मद्यप्राशन करून वाहने चालविणारे  14 वाहन चालक आढळून आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हे दाखल करून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठेत तसेच नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या  11 वाहन चालकांवर देखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

या वेळी वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत समज देऊन, दारू पिऊन वाहन चालविल्याने होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत जनजागृती देखील करण्यात आली.

सदरची कामगिरी मा. राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संदिप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक पो हवा.सचिन साळुंखे, प्रवीण कोळी , रतन चव्हाण, जयवंत गोसावी पो.ना.कपिल टिकोळे पो शि सुधीर जाधव, वैभव यादव, शशिकांत घाडगे , हर्षल सुखदेव यांनी केली आहे 

कराड वाहतूक शाखेकडून अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून, सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा, कराड शहर यांचेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!